aadesh bandekar shared post and said dont trust such allegations of financial scam siddhivinayak temple recently we do social help one women who left her lakh of rupees in taxi sakal
मनोरंजन

Aadesh Bandekar: अफवांवर विश्वास ठेऊ नये.. आरोपांवरुन आदेश बांदेकरांची पुन्हा सूचक पोस्ट..

आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवर बांदेकरांनी उदाहरण देऊन सुनावले.

नीलेश अडसूळ

Aadesh Bandekar: मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यासात अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी गैरव्यवहार केल्या आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

एरव्ही आपल्याला हसवणारे, कार्यक्रमातून मनोरंजन करणारे आदेश भावोजी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या प्रकरणी आदेश बांदेकरांनी एक सूचक पोस्ट लिहिली आहे.

(aadesh bandekar shared post and said dont trust such allegations of financial scam siddhivinayak temple recently we do social help one women who left her lakh of rupees in taxi)

आरोप काय आहेत?

आदेश यांच्यावर, शिवभोजन थाळीसाठी न्यासाने बेकायदेशीरपणे 5 कोटी रुपये दिल्याच्या आरोप आदेश बांदेकर यांच्यावर करण्यात आला आहे. शिवाय सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने एका कंपनीकडून 15 ते 16 हजार लीटर साजूक तुपाची खरेदी केली. करोना काळात लॉकडाऊनदरम्यान हे तूप विकून टाकण्यात आले.

लॉकडाऊननंतर 2021 मध्ये मंदिर पुन्हा खुले झाल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू केली. या कामासाठी 40-50 लाखांचा खर्च अपेक्षित असताना 3.5 कोटींचे कंत्राट ट्रस्टशी संबधित व्यक्तीला देण्यात आले. मंदिराच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीच्या कामातही बराच गैरव्यवहार झाला आहे. हे आरोप सदा सरवणकर यांनी केले आहेत.

तर काल यासंदर्भात आदेश बांदेकर यांनी एक पोस्ट केली.

काल केलेल्या पोस्टमध्ये आदेश म्हणाले..

"माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना .अजूनही मी मर्यादा पाळत आहे."

ही पोस्ट ताजी असतानाच आदेश यांनी पुन्हा एक सूचक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये मंदिरातील सामाजिक कामांचा त्याने दाखला दिला आहे.

आदेश म्हणतात,

“श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराबाबत पसरवत येणाऱ्या अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये.” आजच दादर पोलिस स्टेशन आणि सिद्धिविनायक सि सि टिव्ही टिम च्या सहाय्याने एका माऊलीचे टॅक्सीत राहिलेले काही लाख रूपये परत मिळवून देण्यात यश मिळाल्याबद्दल दादर पोलीस स्टेशन कडून टिमला धन्यवाद देण्यात आले… अभिनंदन टिम सिद्धिविनायक आणि दादर पोलीस स्टेशन'' अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT