Ashvini Mahangade  Esakal
मनोरंजन

Ashvini Mahangade: घर बांधण्यासाठी फळ्या अन् मयतीसाठी जळण...अश्विनीनं सांगितली तिच्या आयुष्यातील लाकूडतोड्याची गोष्ट..

Vaishali Patil

Ashvini Mahangade Post: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे ही नेहमी चर्चेत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भुमिका साकारुन ती घराघरात पोहचली आहे.

अश्विनी केवळ मालिकाचं नाही तर नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातुनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. ती काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात दिसली होती. आता ती तिचा नवा चित्रपट “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” साठी चर्चेत आहे.

अश्विनी महांगडे ती सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेयर करत असते. आता अश्विनीनं नुकतच तिचं एका साडीतील फोटोशूट इंस्टाग्रामवर शेयर केलं आहे. हे फोटोशुट तिने एका लाकडाच्या वखारीत केलं आहे.

हे फोटो पोस्ट करत तिने तिच्या आयुष्यातल्या खऱ्या लाकूडतोड्याची गोष्ट सांगितलं आहे. तो लाकूडतोड्या म्हणजे अश्विनीचे वडील. या पोस्टमध्ये ती लिहिते की,

"गोष्ट एका लाकूडतोड्याची...

काही फोटोशूट हे अर्थपूर्ण असतात. हे फोटोशूट मी माझ्या घरी केले. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मागे लाकूड आहे, जळण पडलंय, कसली तरी मशीन आहे आणि हे कसले घर?

नाना (माझे वडील) यांनी सुरुवातीच्या काळात कामधंदा सुरू करताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पण जम बसला नाही तरीही प्रयत्न मात्र थांबले नाहीत. त्यावेळी कुणाच्या तरी शेतातील सुकलेले झाडं, शेतात बांधावर असलेले बाभळीचे झाड ते विकत घेवु लागले आणि सुरू झाला माझ्या बापमाणसाचा लाकूडतोड्या हा व्यवसाय.

अतिशय कष्टाचा हा व्यवसाय. तेव्हा गॅस नव्हते त्यामुळे चुलीसाठी जळण, घर बांधण्यासाठी फळ्या, आणि मयतीसाठी जळण असा त्याचा वापर व्हायचा. या कामात त्यांची साथ माझ्या मम्मीने तर दिलीच पण त्याहीपेक्षा जास्त साथ ही त्यांच्या आईने लक्ष्मीबाई हिने दिली. रोज वखारित जावून बसायला लागायचे. ते काम आज्जी करायची. १-१ पैशाचा हिशोब रात्री ती नानांना सांगायची.

नाना खूप अभिमानाने सांगायचे की मी लाकूडतोड्या आहे आणि मला आपली लोखंडाची कुऱ्हाडच प्रिय. एक उत्तम कलाकार असूनही केवळ आपल्या कुटुंबासाठी,पोटापाण्यासाठी वेगळे क्षेत्र निवडून त्यावर प्रेम केले आणि त्याचा आम्हालाही आदर आहे. मयतीसाठी लागणारे लाकूड ही आपल्यासाठी फार साधी गोष्ट असेल पण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची.

कारण मेलेल्या माणसाला अग्नी दिल्यानंतरच त्याची मुक्ती होते आणि त्यासाठीचे एक महत्त्वाचे काम आपण करतो असे ते समजायचे. आता आम्ही सुद्धा तेच मानतो. कोरोनाच्या काळात कुणीही नातेवाईक साध्या आजाराने जरी कोणाचा मृत्यू झाला तरी खांदा द्यायला तयार नव्हते. त्यावेळी ते कामही नानांवर पडले किंवा त्यांनी ते स्वीकारले.

आणि मृतदेह आमच्या पीकअप मधून घेवून जाणे हे एक काम वाढले. नानांनी हे काम करावे अशी माझी इच्छा अजिबात नव्हती कारण यात त्यांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण त्यांना असे कायम वाटायचे की हे देवाने माझ्यावर जबाबदारीने टाकलेले काम आहे.

हे काम त्यांनी शेवटपर्यंत केले आणि यातच त्यांना कारोना झाला.

वखार आजही आहे. त्यांच्याशिवाय पण त्यांच्या तत्वांवर. हळूहळू अनेक गाड्या आल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी संधी शोधल्या आणि काम सुरू केले पण आजही एक काम निष्ठेने केले जाते आणि ते म्हणजे मयतीसाठी जळण दिलं जातं. मम्मी म्हणते यात फायदा नाही झाला तरी हे काम बंद नाही करायचे कारण हीच आपली सुरुवात आहे आणि सेवा.

महालय/ महाळाचा पंधरवडा सुरू होईल. ४ माणसं घरी येतील, जेवतील. पण गेलेल्या माणसाचे विचार हे महत्त्वाचे आहेत."

सध्या अश्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अश्विनीच्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाची शुटिंग सध्या सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT