aai kuthe kay karte fame actor milind gawali in renuka mata mandir share experience after his mother death SAKAL
मनोरंजन

Milind Gawali: आई गेल्यानंतर रेणुका मातेच्या मंदिरात गेलो आणि... मिलिंद गवळींना आलेला विलक्षण अनुभव

मिलींद गवळी यांनी रेणुका माता मंदिरात त्यांना आईचा भास कसा झाला याचं वर्णन केलंय

Devendra Jadhav

Milind Gawali Post on Renuka Mata News: आई कुठे काय करते मालिका सध्या चांगलीच चर्चेत होती. मालिकेतील अनिरुद्धची भुमिका साकारणारे मिलिंद गवळींना त्यांच्या फॅन्सचं प्रचंड प्रेम मिळतंय.

मिलिंद गवळी यांची खलनायकी भुमिका असली तरी चाहते त्यांचे फॅन्स आहेत. मिलिंद गवळी सोशल मिडीयावर विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या आयुष्यातील किस्से शेअर करत असतात. अशातच मिलिंद गवळी यांनी रेणुका माता मंदिरात त्यांना आईचा भास कसा झाला याचं वर्णन केलंय.

(Aai Kuthe Kay Karte fame actor milind gawali in Renuka Mata Mandir)

“आई रेणुका लय भारी “ सिनेमा आणि आईचं कनेक्शन

मिलिंद गवळी लिहीतात.. “आई” “आई रेणुका लय भारी “ या चित्रपटाचा शूटिंग कोल्हापुरात झालं, काही भाग रेणुका आईच्या यल्लम्मा मंदिरात , सौंदत्ती कर्नाटका मध्ये झाला,
आणि या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अलकाताई कुबल यांनी या चित्रपटांमध्ये विलनची भूमिका केलेली आहे, अलकाताई विलन म्हणजे त्यांच्या सोशिक प्रतिमेच्या अगदी विपरीत अशी भूमिका."


मिलिंद गवळी पुढे लिहीतात.. "हा चित्रपट टीव्ही वर संध्याकाळी सहा वाजता वर्ल्ड प्रीमियर होणार आहे असं आमच्या प्रोड्युसराने म्हणजेच सांगलीचे अण्णासाहेब उपाध्ये यांनी मला सांगितलं, इतक्या वर्षानंतर हा चित्रपट लोकांसमोर आता येणार आहे म्हणून मला खूप छान वाटलं. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो कारण चित्रपटात काम करण्याच्या निमित्ताने मला या अशा पवित्र स्थळावर जायची संधी मिळाली आणि आई रेणुका यल्लमा देवीचे दर्शन छान पद्धतीने घेता येईल, माझी आई गेल्यानंतर ज्या ज्या वेळेला मी अशा ठिकाणी गेलोय तिथे मला माझ्या आईचा नेहमी भास होतो. "

शुटींगच्या दिवशी मंदिरात भेटली म्हातारी बाई आणि...

मिलिंद गवळी पुढे लिहीतात.. "शूटिंगच्या दिवशी मी मेकअप करून मंदिरात पोचलो, रेनूका आईचं दर्शन घेतलं आणि शॉर्ट साठी वाट बघत होतो, मला आमचे डिरेक्टर म्हणाले “तुम्ही गाडीत बसा आमची तयारी झाली की तुम्हाला बोलवतो”, गाडीत बसून मनात विचार चालले होते की आज माझी आई असती आणि तिला कळलं असतं की मी रेणुका मंदिरात शूटिंग करतो आहे तर तिला खूप आनंद झाला असता, आणि काही क्षणातच एक गरीब म्हातारी बाई डोक्यावर एक टोपली घेऊन माझ्या समोर आली, ती कान्नडी भाषेमध्ये काहीतरी बोलायला लागली, ती काय बोलतेय हे मला काही कळलं नाही, मी पैसे काढून तिला द्यायला लागलो तर ती नाही पैसे नको आहेत असं म्हणाली, तिने टोपलीतून दोन भाकऱ्या काढल्या , त्याच्याबरोबर पिठलं आणि मेथीची भाजी त्या भाकऱ्यांवर ठेवली आणि त्या भाकऱ्या तिने मला दिल्या , मला म्हणाली “ईद्धनु तिन्नू”. ड्रायव्हर कानडी होता तो मला म्हणाला “ आजी म्हणतात खाऊन घे “

आई कुठे काय करते आणि आईचं कनेक्शन

मिलिंद गवळी पुढे सांगतात.. "मी पैसे द्यायला लागलो तर आजी नको म्हणाली आणि भाकर्या देऊन निघून गेली. मी त्या मंदिराच्या परिसरात बसून त्या दोन्ही भाकऱ्या मनापासून खाल्ल्या. अनेक वर्ष हे स्मरणात राहिलेलं,

आज संध्याकाळी सहा वाजता हा सिनेमा जेंव्हा लोकांसमोर येत आहे असं मला जेव्हा कळलं, तेव्हा पटकन हि गोष्ट डोळ्यासमोरून गेली आणि ती वयस्कर बाई जिने मला भाकरी दिली ती पटकन डोळ्यासमोर येऊन गेली.

खरंच काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या, आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी असतात, इतक्या वर्षानंतर “आई कुठे काय करते” चं यश आणि आजच्या दिवशी “आई रेणुका” च्या सिनेमा चं एका चॅनेलवर वर्ल्ड प्रीमियर. या दोघांमध्ये सामान्य घटक काय असेल तर ते आहे “आई” ! "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

IPL Mega Auction 2025: 'हे' ५ अनकॅप गोलंदाज होऊ शकतात करोडपती, फ्रँचायझींची असेल नजर

Tirupati Temple : तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

Sports Bulletin 19th November: दिल्ली कॅपिटल्सने रिटेन न करण्यावर ऋषभ पंतने सोडलं मौन ते रॉजर फेडररचं राफेल नदालला भावनिक पत्र

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

SCROLL FOR NEXT