Ashvini Mahangade in Maharashtra Shaheer News: महाराष्ट्र शाहीर सिनेमातील महाराष्ट्र राज्यगीत लोकार्पण सोहळा आज मोजक्या पत्रकारांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र शाहीरचे निर्मात्या बेला शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, शाहीर साबळेंची भूमिका साकारणारा अंकुश चौधरी, भानुमतीची भूमिका साकारणारी सना शिंदे अशी टीम उपस्थित होती.
या सोहळ्यात पहिल्यांदा केदार शिंदेंनी अशी गोष्ट केली जी आजवरच्या प्रमोशनमध्ये केली नव्हती.
(aai kuthe kay karte fame Ashvini Mahangde will play this role in 'Maharashtra Shaheer' Kedar Shinde movie)
हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
महाराष्ट्र शाहीर सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे. याच सिनेमात आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे सुद्धा सहभागी आहे.
अश्विनी महांगडे सिनेमात कोणती भूमिका साकारणार याचा मात्र उलगडा अजून झाला नव्हता. अखेर आज महाराष्ट्र राज्यगीत लोकार्पण सोहळ्यात केदार शिंदेंनी स्वतःहून खुलासा केला आणि अश्विनीला थेट मंचावर स्थान दिलं.
महाराष्ट्र शाहीर सिनेमातील दोन कलाकारांची केदार शिंदेंनी ओळख करून दिली. त्यापैकी एक शाहिरांच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते.
तर शाहिरांच्या पहिल्या पत्नीची भानुमतीची भूमिका केदार शिंदेंची लेक सना शिंदे साकारत आहे.
तर शाहिरांना खऱ्या अर्थाने सांभाळणारी शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाईंची भूमिका अश्विनी साकारत आहे. केदार शिंदेंनी आज सर्व कलाकारांसोबत आज अश्विनी आणि शुभांगी यांना मंचावर स्थान दिलं.
महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित अवघ्या काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. महाराष्ट्र शाहीर सिनेमात आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेला पाहण्याची तिच्या फॅन्सना उत्सुकता आहे.
महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.