Madhurani Prabhulkar, Madhurani Prabhulkar news, aai kuthe kay karte SAKAL
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: गेली ३ वर्ष मी माझ्या मुलीसोबत.. अपराधीपणाच्या भावनेतुन मधुराणीने केली ही पोस्ट

मधुराणी आणि स्वराली ही मायलेकींनी जोडी सिडनीला गेलीय. मधुराणी यानिमित्ताने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत

Devendra Jadhav

Madhurani Prabhulkar Aai Kuthe Kay Karto News: आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर चर्चेत असते. मधुराणीला आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली.

मधुराणी सध्या शुटिंगमधून ब्रेक घेऊन तिची लेक स्वराली सोबत परदेश वारीला गेलीय. मधुराणी आणि स्वराली ही मायलेकींनी जोडी सिडनीला गेलीय. मधुराणी यानिमित्ताने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत

मधुराणी लिहिते.. गेली ३ वर्षं माझं एक विशिष्ट रूटीन झालंय. ७/८ दिवस मुंबईत शूट करायचं आणि २/३ दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा.

सोपं नव्हतं, नाहीये.... long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो... गेल्या ३ वर्षात सलग असे ८/१० दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही. ह्याची रुखरुख असते, अपराधीपण असतं.. आणि खूप सारा ताण असतो.

मधुराणी पुढे लिहिते.. माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिप ची ही संधी चालून आली. ह्या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कविमानाचा उमेश थत्ते.

एक दिवस अचानक त्याचा फोन आला 'मी तुझ्या 'कवितेचं पान' चा मोठा फॅन आहे...इथे काही कवी आहेत...तुझा एपिसोड इथे करता येईल का ? ' मी म्हंटलं, '

मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते'त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं...

मधुराणी पुढे लिहिते.. "'आई... 'च्या टीम ने पण प्रंचड cooperate करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तिथले एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरालीची ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली.

आणि ती तशी झाली ती आमच्या प्रेमळ होस्ट्स मुळे... उमेश- गौरी थत्ते आणि त्यांची मुलं अवनीश आणि अर्णव.

आमची उत्तम राहण्याची सोय, खाण्यापिण्याची चंगळ तर ह्यांनी पुरवलीच पण स्वरालीची खूप प्रेमाने काळजी घेतली , खरंतर तिचे लाड केले, सारे हट्ट पुरवले असंच म्हणायला हवं..

मधुराणी शेवटी लिहिते.. सिडनीमधलं जिणं खूप धकाधकीचे आहे, त्यात आपल्या पाहुण्यांसाठी रजा काढून त्यांना ठिकठिकाणी घेऊन जाणं, उत्साहाने फिरवणे इतकं सोपं नाही हो... त्यांनी केला तो पाहुणचार नाही तर जीव लावणं असच म्हणायला हवं...

सिडनी ट्रिप उत्तम झालीच पण स्वराली ला अजून एक प्रेमाची फॅमिली मिळाली आणि दोन दोन दादा सुद्धा...!!

अशाप्रकारे मधुराणीने मुलीला सोडून शूटिंग करणं किती अवघड असतं आणि या छोट्याश्या सुट्टीमुळे तिला आणि तिच्या मुलीला कसा वेळ मिळाला याबद्दल भाष्य केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT