Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. आता या मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे. अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झालं आहे. आई कुठे काय करते या मालिकेत अभिनेता ओंकार गोवर्धन आशुतोष ही भूमिका साकारत होता. आता ओंकारची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. अशताच आता ओंकारसाठी अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali ) यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. नुकतीच मालिंद गवळी यांनी "आई कुठे काय करते" या मालिकेमधील आशुतोष म्हणजेच ओंकार गोवर्धन याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मिलिंद यांनी ओंकारसोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "ओमकार गोवर्धन" याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली! तीन साडेतीन वर्षांपूर्वी "आई कुठे काय करते" या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती, अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या आई कुठे काय करते च्या सेटवर जिन्यामध्ये झाली , मी ओमकारला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत, गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं तो सिनेमा होता निळकंठ मास्तर त्या निळकंठ मास्तरच्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकर च्या भूमिकेसाठी आई कुठे काय करते मध्ये आला होता , मला त्याला बघून आनंद झाला, कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे, तिचं कास्टिंग कधी चुकत नाही, मी ओमकार ला शुभेच्छा दिल्या, आणि त्याला म्हटलं “वा मजा येणार आता , मला खात्री आहे तू छानच काम करशील !आणि अगदी तसंच झालं ओमकार ने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली, की तो सगळ्यांचा लाडका झाला !
"मी आणि आप्पा ज्या मेकअप रूममध्ये होतो त्याच मेकअप रूम मध्येच ओमकारची सोय करण्यात आली आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त कला, मस्ती आणि हास्य रसाचा वर्षाव झाला , humour काय असतं हे ओमकार कडून शिकावं , सतत प्रसन्न राहणे , हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा, पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते Director ला विचारून त्याचा निरसन करायचं, एखाद्याचं वाक्य चुकलं,शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं,पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं, त्याची तर असंख्य सिनेमांची गाणी सुद्धा तोंड पाठ असायची , कधी कधी मेकअप रूम मध्ये आप्पा ,अनीश आणि त्याच्यात्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे,मला माहितीये मी त्याला खूप खूप miss करणार! जसा लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल,तसंच काहीस feeling आहे,पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व , त्याची अभिनयाची जाण , आणि त्याचं professionalism, त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे!ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा, असंही मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.