Aamir Khan donates ₹25 lakh to families affected By Landslides In Himachal Pradesh \ Esakal
मनोरंजन

Aamir Khan: मनानेही 'अमिर'! हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांसाठी मिस्टर परफेक्शनिस्टनं केला मदतीचा हात पुढे..

Vaishali Patil

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. मात्र आता त्याने केलेल्या कृतीमुळे त्याचे कौतुक होत आहे.

हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या आपत्तीमुळे तेथील परिस्थीती खुप वाईट झाली आहे. तेथील लोकांची अवस्था देखील वाईट आहे.या आपत्तीमुळे विनाशकारी भूस्खलन, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. इमारती कोसळल्या आहेत.

आमिरने हिमाचल प्रदेशात झालेल्या आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आमिरने आपत्ती निवारण निधी 2023 मध्ये 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ठाकूर सुखविंदर सिंग सुखू यांनी आमिर खानच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. ही मदत आपत्तीनंतर पीडित कुटुंबांना सावरण्यासाठी मदतीसाठी आणि त्याचे पुनर्वसन करण्यासाठी वापरली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत.

आमिरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप तर झालाच मात्र त्यामुळे आमिरला टीकेला सामोरेही जावे लागले आता त्याने दोन वर्षांसाठी चित्रपटातुन ब्रेक घेतला आहे.

आमिरची माजी पत्नी किरण रावने दिग्दर्शित केलेल्या 'लापता लेडीज' या चित्रपटाचा 8 सप्टेंबर रोजी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भव्य प्रीमियर झाला. या चित्रपटाला टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT