Aamir Khan Laal Singh Chaddha And Netflix : आमिर खानच्या चित्रपटांची लोक नेहमी प्रतिक्षा करत असतात. मात्र कोरोना काळानंतर सर्वकाही बदलले आहे. तसेच त्याचे चाहतेही बदलले. त्यामुळेच लालसिंग चड्ढाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक आणि ओटीटी प्लॅटफाॅर्मवर खरेदीदार मिळाले नाही. मात्र आता वाटते की निर्माते आणि आमिर खानच्या (Aamir Khan) अडचणी कमी झाल्या आहेत.
लालसिंग चड्ढा ओटीटीवर
वृत्तांनुसार आमिर खानचा चित्रपट 'लालसिंग चड्ढा'ला ओटीटी खरेदीदार मिळाला आहे. नेटफ्लिक्सने तिचे ओटीटी हक्क विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र कमी किंमतीत. अगोदर वृत्त होते, की नेटफ्लिक्स आमिरचा चित्रपट खरेदीसाठी उत्साहित होते.
निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससमोर (Netflix) १५० कोटींची डिल ठेवली होती. मात्र नेटफ्लिक्सला ही डिल जास्त वाटली होती आणि ८०-९० कोटींची बोलणी झाली होती. परंतु बाॅक्स ऑफिसवरील खराब कामगिरीनंतर ती ५० कोटींवर आली.
नेटफ्लिक्सने खरेदी केला चित्रपट
या दरम्यान वृत्त आले की नेटफ्लिक्सने लालसिंग चड्ढाबाबत झालेला करार रद्द केला. दुसरीकडे निर्मात्यांनी डिजिटल प्लॅटफाॅर्म शोधले आणि व्हूटबरोबर १२५ कोटींचा करार ठरला. मात्र पुन्हा मोठा ट्विस्ट आला आहे. लालसिंग चड्ढाचे निर्माते आणि नेटफ्लिक्समध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली.
दोन्ही पार्ट्यांनी नुकसान ऐवजी फायदाचा विचार केला. आमिरला नेटफ्लिक्समुळे जागतिक प्रेक्षक मिळेल. दुसरीकडे ओटीटीवर आल्याने चित्रपटाचे परदेशी व्यवसायमुळे फायदा होईल.
८ आठवड्यानंतर आमिरचा चित्रपट पाहाता येईल
कारण काही असो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली. आता ते नेटफ्लिक्सवर आमिरच्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील. लालसिंग चड्ढा प्रदर्शित झालेल्या तारखेपासून ८ आठवड्यानंतर तुम्हाला मोबाईलवर पाहाता येईल. चित्रपट निर्मात्यांनी आपले रेटही कमी केले आहेत.
वृत्तानुसार लालसिंग चड्ढाची नेटफ्लिक्सबरोबर डिल ८०-१२५ कोटी दरम्यान आहे. तरही १०० कोटींपेक्षा कमी आहे. मात्र या डिलची अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे चित्रपटाचे १५ दिवसांचे कलेक्शन ५८.७३ कोटी झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.