Aamir Khan Laal Singh Chaddha Oprning box office collection better than akshay kumar Rakshabandhan? Google
मनोरंजन

Box office: 'रक्षाबंधन' च्या पुढे निघून गेला 'लाल सिंग चड्ढा? जाणून घ्या

अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि आमिरचा लाल सिंग चड्ढा हे दोन्ही सिनेमे ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाले आहेत.

प्रणाली मोरे

Box Office Collection of Laal Singh Chaddha & Rakshabandhan: २०२२ मधील दोन मोठे सिनेमे सध्या बॉक्सऑफिसवर एकमेकांसमोर धडकले आहेत. अक्षयचा 'रक्षाबंधन' आणि आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' अखेर रिलीज झाले आहेत. आणि आता दोघांचेही बॉक्सऑफिस कलेक्शनचे आकडे समोर येऊ लागले आहेत. आमिर खान,करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमार-भूमी पेडणेकर यांचा 'रक्षाबंधन' गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी मोठ्या धूमधडाक्यात सिनेमागृहात रिलीज झाले आहेत.(Aamir Khan Laal Singh Chaddha Oprning box office collection better than akshay kumar Rakshabandhan?)

दोन्ही सिनेमांविषयी सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड सुरु होता, पण दोन्ही सिनेमांना लोकांनी सोशल मीडियावर पाठिंबा देखील दिलेला दिसून आला. अशात आता सगळ्यांच्या नजरा आहेत ते या दोन्ही सिनेमांच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर. आता 'लाल सिंग चड्ढा'आणि 'रक्षाबंधन' यांच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्सऑफिस कमाईचे आकडे समोर आले आहेत. दोन्ही सिनेमांना बॉक्सऑफिसवर ओपनिंग काही फारशी चांगली मिळाली नसल्याचं चित्र सध्या दिसून येतेय.

'लाल सिंग चड्ढा'ची पहिल्या दिवशीची कमाई

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा सिनेमाला समिक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या पहायला मिळाल्या. सिनेमागृहात सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांनी देखील सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्याच दिसून आल्या. बॉक्सऑफिसवरील पहिल्या दिवशीची लाल सिंग चड्ढाची कमाई केवळ १२ करोडच्या आसपासच झालेली आहे.

कदाचित या आठवड्याभरात बॉक्सऑफिस कलेक्शनचे गणित बदलू देखील शकते. २०२२ मध्ये जे इतर सिनेमे रिलीज झाले त्यांच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनशी याची तुलना केली तर लाल सिंग चड्ढाची कमाई फार कमी आहे असं देखील म्हणता येणार नाही. पण जर का आमिर खानचा सिनेमा म्हणून पाहिलं तर त्याच्या सिनेमानं केलेली ही पहिल्या दिवशीची कमाई तशी कमीच म्हणावी लागेल.

अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन'ची पहिल्या दिवशीची कमाई

अक्षय कुमारच्या सिनेमासाठी सगळ्यात महत्त्वाचा दमदार मुद्दा हा होता की सिनेमाचं कथानक रक्षाबंधन सणावरच आधारित होतं,ज्या दिवशी सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या कथेत इमोशन्स आहेत. छान कुटुंब दाखवलं आहे आणि अर्थात अक्षय कुमार आहे,जो नेहमीच याआधी सणांदिवशी सिनेमे रिलीज करुन यशस्वी ठरलेला आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवशीचं कलेक्शन पाहिलं तर ते जवळपास ९ करोडच्या आसपास आहे.

पण जर का अक्षयच्या २०२२ मध्ये रिलीज झालेल्या दोन मोठ्या फ्लॉप सिनेमांची म्हणजे 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज'ची पहिल्या दिवशीची कमाई पाहिली तर त्या तुलनेत 'रक्षाबंधन'ची पहिल्या दिवशीची कमाई कमीच आहे. पण 'रक्षाबंधन' सिनेमाचं बजेट मात्र या दोन्ही सिनेमांपेक्षा कमी आहे ,त्या तुलनेत पाहिलं तर मग रक्षाबंधनची पहिल्या दिवशीची कमाई ठीकठाक म्हणावी लागेल.

दोन्ही सिनेमांसाठी सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की रिलीजच्या दिवशी यांच्या वाट्याला मोठा वीकेन्ड आला आहे. आणि पुढील ३ दिवसांची कमाई या दोन्ही सिनेमांचे भवितव्य ठरवणार आहे. आता चाहत्यांची नजर आहे ती लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधनच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनवर.

पण जर का पहिल्या दिवशीच्या दोन्ही सिनेमांची कमाई पाहिली तर आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'नं अक्षयच्या 'रक्षाबंधन'ला मागे टाकलं आहे हे देखील नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT