Aamir Khan Comment On Bollywood Box Office Collection : आमिर खानचा आणखी एक चित्रपट 'लालसिंग चड्ढा' ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास तयार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे चाहत्यांना खूपच आवडले आहेत. मात्र चित्रपटावरुन नव-नवीन वादालाही तोंड फुटत आहे. आमिर खानचे (Aamir Khan) जुने वक्तव्य खोदून काढून नेटीझन्स 'लालसिंग चड्ढा'च्या विरोधात उतरली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बाॅयकाॅटलालसिंगचड्ढा अनेकदा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. मात्र आमिरला याची चिंता नाही. उलट त्याला आपल्या चित्रपटाविषयी आत्मविश्वास आहे. चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन करत असलेला आमिर गेल्या महिन्यांमध्ये बाॅक्स ऑफिसवर बाॅलीवूडच्या (Bollywood News) कमी कमाईसाठी ओटीटी प्लॅटफाॅर्म्सला जबाबदार ठरवले आहे. (aamir khan says ott weak box office collection of hindi films)
ओटीटीवर आमिर नाराज का?
आमिर म्हणाला प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यानंतर चित्रपट ओटीटीवर जाणण्याने तिचा बाॅक्स ऑफिसवर खराब कामगिरीचे कारण आहे. चित्रपट ओटीटीवर खूपच लवकर येतात. हेही एक कारण असल्याचे त्याने सांगितले. म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना म्हणतायत, चित्रपटगृहात जाऊन पाहू नका. मी तुमच्या घरी येत आहे.
का चाललात चित्रपटगृहात? दोन आठवडे थांबा मी येत आहे. त्यामुळे तुम्ही लोक सिनेमा पाहायला येण्याची आशा कशी ठेवता येईल ? यात कोणतेही तर्क नाही. त्यामुळे मी यापूर्वीच समजून घेतले होते, मी नेहमी आपल्या चित्रपटांसाठी ६ महिन्यांचा गॅप ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला माहित नाही की इंडस्ट्री काय करत आहे.
निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक लोकांच्या आवडी व्यतिरिक्त इतर विषय निवडत असल्याने चित्रपट अपयशी ठरण्यास जबाबदार आहे. आमिर पुढे म्हणतो, एक चित्रपट निर्माता म्हणून तुमच्या भावना जागृत ठेवत आहे. कधी हसवतो, कधी रडायला लावतो. जर मी राजू हिरानी असेल तर मी तुमच्याबरोबर हसू आणि रडवू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.