KRK Latest News KRK Latest News
मनोरंजन

KRK : केआरकेचा आमिर खानवरून शाहरुख-सलमानवर हल्ला; दिला इशारा

याआधीही केआरकेने इंडस्ट्रीतील तिन्ही खानांना खुनावले आहे

सकाळ डिजिटल टीम

KRK Latest News बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंग चड्ढा या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप आशा होत्या. परंतु, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने निराश केले आहे. चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली आहे. कमाल आर खान म्हणजेच केआरकेने लाल सिंग चड्ढाच्या खराब व्यवसायाबाबत आमिर खानची खरडपट्टी काढली आहे. आमिर खानचे करिअर संपले आहे, असा दावा केआरकेने (KRK) केला आहे.

केआरकेने ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये आमिर खानच्या (Aamir Khan) करिअरचा अंत झाल्याचा दावा केला आहे. सोबतच लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या खराब व्यवसायानंतर केआरकेने सलमान आणि शाहरुखला त्यांचे चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्यास सांगितले आहे. केआरकेने ट्विटमध्ये सलमानच्या (Salman Khan) नावाचा उल्लेख केलेला नाही. परंतु, त्याच्या लेखनशैलीवरून इतके स्पष्ट होते की त्याने ट्विटमध्ये फक्त सलमानबद्दलच बोलले आहे.

केआरके इथेच थांबला नाही, तर दुसऱ्या ट्विटमध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानवर हल्ला चढवला. जर कोणाला त्याच्या चित्रपटाच्या अपयशाबद्दल एक टक्के देखील शंका असेल तर त्याने @iamsrk bhai jaan कडून चित्रपटात एक सीन करून घ्यावा. याआधीही केआरकेने (KRK) इंडस्ट्रीतील तिन्ही खानांना खुनावले आहे.

आता पुन्हा एकदा त्याने आपल्या धारदार शैलीने आमिर, शाहरुख (Shah Rukh Khan) आणि सलमानवर हल्ला चढवला आहे. केआरकेच्या या चॅलेंजला आमिर, शाहरुख आणि सलमान कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शाहरुख आणि सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर किंग खानचा पठाण चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शाहरुखचा जवानही चर्चेत आहे. शाहरुखही अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. २०२३ शाहरुखच्या नावावर असणार आहे. दुसरीकडे सलमानही भाईजान या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर थिरकण्यास सज्ज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT