Aamir Khan Support China News: गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर बरेच काही बदलले आहे. एकीकडे भारताने चायनीज गोष्टींवर बहिष्कार टाकला आहे.
भारत - चीन संघर्षाच्या काळात बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मात्र चिनी चित्रपटांचे प्रमोशन करणे भोवले आहे. आमिर खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो चाहत्यांना Never Say Never हा चीनी चित्रपट पाहण्याचे आवाहन करत आहे.
तर दुसरीकडे चीनमध्ये भारतीय चित्रपट 'भारतीयन'वर बहिष्कार टाकण्यात येत आहे. आता आमिर खानचे चायनीज प्रेम पाहून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
(aamir khan troll for support china movie never say never)
वास्तविक आमिर खानचा एक व्हिडिओ ग्लोबल टाइम्सने ट्विट केलाय. या व्हिडिओमध्ये आमिर खान त्याचा मित्र आणि चीनी दिग्दर्शक वांग बाओकियांगच्या Never Say Never या नवीन चित्रपटाला सपोर्ट करतोय. हा चित्रपट 6 जुलै रोजी चीनी भाषेत प्रदर्शित झाला आहे.
आमिर खान म्हणाला की, हा सिनेमा एकदम उत्साहवर्धक आहे.. मला आशा आहे की हा चीनी चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडू शकेल. आता आमिरचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. काही युजर्स आमिर खानला मोदीविरोधी म्हणत आहेत, तर काही लोकांचे म्हणणे आहे की, आमिर खानचे चीन आणि पाकिस्तानवरील प्रेम उतु जात आहे.
आमिर खानच्या सिनेमांना चीनमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आमिर खानच्या चित्रपटांनी चीनमध्ये चांगली कमाई केली आहे. ज्यामध्ये 3 इडियट्स ते दंगल सारख्या चित्रपटांना चीनमध्ये खूप प्रेम मिळाले. आमिर खानचे चित्रपट चीनमध्ये खूप पसंत केले जातात.
त्याचवेळी 'भारतीयन' या भारतीय चित्रपटाला चीनमध्ये विरोध होत आहे. या चित्रपटात भारत आणि चीनमधील संबंध चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दोन्ही देशांमधील संबंध वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून दाखवण्यात आले आहेत. तर भारतातील काही लोक याला देशभक्तीपर चित्रपट म्हणत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.