AAP compares Shah Rukh Khan’s Jawan dialogue with Arvind Kejriwal’s old speech Sakal
मनोरंजन

Jawan ने चोरले 'आम आदमी पार्टी'चे डायलॉग? केजरीवालांच्या भाषणाशी तुलना; 'आप'चे ट्वीट व्हायरल

Vaishali Patil

Politics over ‘Jawan’: बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानने पुन्हा एकदा धमाका केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा जवान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. तमिळ चित्रपट निर्माता अॅटली दिग्दर्शित हा चित्रपट गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात रिलिज करण्यात आला.

हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडत जवानने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग कलेक्शन केले. यासोबत हा चित्रपट दोन दिवसात ब्लॉकबस्टर ठरला आहे.

एकीकडे अनेकांनी हा चित्रपट सुपरहीट असल्याचं सांगितलं आहे तर कलाकारही या चित्रपटाची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. सध्या सोशल मीडियावर फक्त शाहरुख आणि जवानचीच चर्चा आहे. या चित्रपटाचे अनेक सीन आणि डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जवानमधील क्लायमॅक्सच्या मोनोलॉगचीही सोशल मीडियावर हवा आहे. या चित्रपटाच्या शेवटी शाहरुख जो चित्रपटात आझादची भूमिका साकारतो तो जनतेला मतदानाच्या अधिकाराबाबात जागरुक करतोय आणि मतदान करतांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी काय करावं हे सांगतोय.

दरम्यान आता सोशल मीडियावर या संबिधत आणखी एक ट्विट व्हायरल होत आहे जे आम आदमी पार्टीकडून शेयर करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये जवान चित्रपटातील एक डायलॉग लिहिला असून त्यासोबत अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे.

AAP compares Shah Rukh Khan’s Jawan dialogue with Arvind Kejriwal’s old speech

शाहरुखच्या 'जवान'मध्ये एक डायलॉग आहे, "भिती, पैसा, जात, धर्म, पंथ यांना मतदान करण्यापेक्षा मत मागायला येणाऱ्या व्यक्तीला एक प्रश्न विचारा, त्याला विचारा की, तो माझ्यासाठी पुढची 5 वर्षे काय करणार? कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी तो काय करणार? मला नोकरी मिळवून देण्यासाठी तो काय करेल? देशाला पुढे नेण्यासाठी तो काय करणार आहे?" हा संवाद शेयर करत जे अरविंद केजरीवाल इतकी वर्षं बोलतायत तीच गोष्ट आज शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये सांगण्यात आली आहे. असं देखील लिहिलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण या सोबत जोडण्यात आले आहे. ते अनेकदा तेच बोलतात. या भाषणातही ते याच मुद्यावर बोलतांना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी केजरीवालांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे शाहरुखच्या जवान चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसतोय.

या चित्रपटाने दिवशी 75 कोटींची कमाई करत सुपरहिट ओपनिंग दिली होती तर दुसऱ्या दिवशी जवानने 53 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यासोबत आता या चित्रपटाची एकूण कमाई 127.50 कोटींच्या आसपास झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT