Aashram 3 Actor and Shekhar Suman's Son Adhyayan Suman Reveals Getting Duped By Baba During His Low Phase Google
मनोरंजन

शेखर सुमनच्या मुलाला भोंदू बाबानं लुबाडलं; लाखो रुपयांचा लावला गंडा

अध्ययन सुमनने नुकतेच एका मुलाखतीच्या निमित्तानं भोंदू बाबाच्या चक्रव्युहात तो कसा सापडला होता याचा किस्सा सांगितला आहे.

प्रणाली मोरे

शेखर सुमनचा(Shekhar Suman) मुलगा अध्ययन सुमनचं(Adhyayan Suman) फिल्मी करिअर फार काही चाललं नाही. पण काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'आश्रम ३' (Ashram 3) वेबसिरीज मधील त्याच्या भूमिकेचं कौतूक होताना दिसतंय. सीरीजमध्ये अध्ययनने पॉप स्टार तिनका सिंगच्या भूमिकेत लोकांची पसंती मिळवली आहे. अध्ययन साठी इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. नुकत्याच एका मुलाखतीत अध्ययननं म्हटलं आहे की,त्यानं आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगात काही धर्मगुरु आणि तथाकथित बाबा लोकांशी संपर्क साधला होता.(Aashram 3 Actor and Shekhar Suman's Son Adhyayan Suman Reveals Getting Duped By Baba During His Low Phase)

अध्ययन म्हणाला कि, ''त्या तथाकथित बाबांनी त्याला आश्वासन दिलं होतं की एका खास तारखेला अभिनेत्याच्या आयु्ष्यात चांगली मोठी गोष्ट घडणार आहे,पण काहीच झालं नाही''. अध्ययनने सांगितलं की,''लोकांनी त्याला फेस रिडिंग करणाऱ्या कुणा बाबा कडे जाण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणाला- लोक म्हणाले की या बाबांना भेट आणि फेस रीडिंग करून घे. मी तिथे पोहोचलो आणि सगळं सांगितलं तसं केलं, तो तथाकथित बाबा म्हणाला,अमूक एका तारखेला तुझ्यासोबत खूप चांगलं काहीतरी घडेल,पण त्या तारखेला काहीच घडलं नाही. त्यानं माझ्याकडून भलीमोठी रक्कम मात्र लूटली. तो मला म्हणाला,ही पूजा कर,तुझ्या आयुष्यात ती करण्यावाचून तुला काहीच पर्याय नाही''.

अभिनेता पुढे म्हणाला- ''हे बाबा लोक तुमच्याकडून भरपूर पैसे लुबाडतात आणि तुम्हाला फक्त इमोशनल बनवतात..पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं केल्यावर जेव्हा आयुष्यात काही घडत नाही तेव्हा अधिक वाईट वाटतं. आणि मग आपण मनातून जास्त खचतो''.

तथाकथित भोंदू बाबा आणि फेस रीडरच्या तावडीत सापडल्यानंतर अध्ययन सुमनने भरपूर पैसे गमावले पण आयुष्यात चांगला धडा मात्र घेतला. तो म्हणतो- ''कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट आणि एकाग्रता हवी. काहीही झालं तरी मी काम पूर्ण करणार हा विचार कायम मनात धरायला हवा. मी स्वतः हा अनुभव घेता आहे. मी आता कधीच हार मानत नाही,माझं काम पूर्ण यशस्वी होईपर्यंत मी मेहनत करतो. असं नाही की 'आश्रम'मुळे मी डायरेक्ट लियोनार्डो डिकॅप्रियो बनलो पण कमीत कमी काम मिळणारा अभिनेता म्हणून तरी ओळखला जाईन''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT