Abhijit Panse: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेता अभिजित पानसे यांनी ताडोबा अभयारण्यातला फोटो पोस्ट करत त्याला दिलेलं कॅप्शन सध्या सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फोडणार असं चित्र सध्या दिसतंय.
अर्थात अभिजित पानसे नेहमीच सोशल मीडियावर महाराष्ट्रातील अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतात. पण सध्याची त्यांची पोस्ट थोडी मिश्किल असली तरी महाराष्ट्रात सध्या जे राजकरण सुरु आहे यावर भाष्य करणारी आहे.
आता पानसे हे केवळ राजकारणात सक्रिय नाहीत तर मनोरंजन क्षेत्रातही त्यांनी आपल्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून दबदबा निर्माण केला आहे. तेव्हा त्या क्षेत्रातील क्रिएटिव्हिटी अनेकदा पानसेंच्या राजकीय पोस्टमधून देखील व्यक्त होत असते.
तेव्हा चला जाणून घेऊया ताडोबा अभयारण्याचा नेमका कोणता फोटो पोस्ट करत पानसेंनी वादातीत चर्चेला तोंड फोडणारं कॅप्शन त्या फोटोला दिलं आहे.(Abhiit Panse Marathi director MNS Politician Post Tadoba Udyan Maharashtra Politics)
अभिजित पानसे यांच्या पोस्टमधील फोटो हा ताडोबा अभयारण्यातला आहे. तिथे 'धन्यवाद' ऐवजी 'धन्यवाघ' असं लिहिलं आहे..फोटोत काळ्या पट्ट्यांच्या रुबाबादार वाघाचा स्टॅच्यू देखील दिसत आहे. पानसेंनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की,''हा ताडोबा उद्यानातला फोटो ! धन्य ‘वाद’ च्या जागी धन्य ‘वाघ’ !!!Creativity आहे का... आता ‘वाघ’ आणि ‘वाद’ हे महाराष्ट्रात समानार्थी शब्द झालेत ??!!!''
आता पानसेंनी पोस्ट करत नेमकं कोणाला डिवचलं..का डिवचलं हे वेगळं सांगायला नकोच. सध्या शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री.उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे आणि त्याचे उमटणारे पडसाद टप्प्याटप्प्यानं समोर येत आहेत. त्यामुळे पानसेंनी केलेली पोस्ट या सध्याच्या राजकारणाला धरुन आहे हे स्पष्ट होत आहे.
पोस्टवर आता हळूहळू कमेंट्स येतायत...ज्यात पानसेंनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे,'अर्थातच..वाघ आणि वाद..समानार्थी शब्द आहेत...' आणि स्माइल इमोजी देखील पोस्ट केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.