Abhishek Bachchan Sakal
मनोरंजन

Abhishek Bachchan Birthday: वडिल सुपरस्टार असतानाही अभिषेक इंडस्ट्रीत येण्यापूर्वी होता LIC एजंट?

अभिषेक बच्चनला आयुष्यात कधीही संघर्ष करावा लागला नसेल, असा सर्वसाधारण समज आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिषेक बच्चन आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक बच्चनबद्दल अनेकदा असे मानले जाते की तो चांदीचा चमचा घेऊन जन्माला आला होता. आजोबा हरिवंशराय बच्चन हे महान कवी होते आणि आई आणि वडील दोघेही चित्रपट जगतातील प्रसिद्ध स्टार होते. अभिषेक बच्चनला आयुष्यात कधीही संघर्ष करावा लागला नसेल, असा सर्वसाधारण समज आहे.

मात्र, तसे नाही. अभिषेक बच्चनला इंडस्ट्रीत येण्यासाठी आणि पहिल्या चित्रपटात काम करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अभिषेक बच्चनने एका मुलाखतीदरम्यान याचा उल्लेख केला होता. दोन वर्षांच्या संघर्षानंतर त्याला 'रिफ्युजी' हा पहिला चित्रपट मिळाला होता.

अभिषेक बच्चनचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या घरी झाला. तो अमिताभ बच्चन यांचा दुसरा अपत्य आहे. त्याला एक मोठी बहीण श्वेता बच्चन नंदा आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन बॉलिवूड डेब्यूपूर्वी एलआयसी एजंट म्हणून काम करत होता. मात्र, अभिनेता होणं नशिबात लिहिलं होतं.

वडील अमिताभ बच्चन यांचा आधार न घेता अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला आहे. 2000 साली अभिषेकने 'रिफ्युजी' चित्रपटात काम केले होते, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. या चित्रपटात अभिषेकसोबत करीना कपूरही होती. दोघांचा हा डेब्यू चित्रपट होता.

अभिषेक बच्चनला 'रिफ्युजी' मिळवण्यासाठी दोन वर्षे लागली, असे म्हटले जाते. एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चन म्हणाला होता, 'अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, त्यामुळे लोक माझ्यासाठी २४ तास रांगेत उभे राहत असतील, पण तसे अजिबात नाही.

पदार्पण करण्यापूर्वी मी प्रत्येक दिग्दर्शकाकडे गेलो आणि त्यांच्याशी बोललो. मात्र, त्यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला. अभिषेकचा पहिला चित्रपट 'रेफ्युजी' फ्लॉप ठरला होता. अभिषेक बच्चनने चार वर्षांत 17 फ्लॉप चित्रपट दिले.

2004 मध्ये अभिषेक बच्चनने 'धूम' चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर त्याने 'बंटी और बबली', 'युवा', 'ब्लफमास्टर', 'गुरु' आणि 'दोस्ताना' सारखे सुपरहिट चित्रपट देऊन आपण अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याचे सिद्ध केले.

अभिषेक बच्चनच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत. पण, शेवटी त्याने स्वत:ला प्रस्थापित केले. अर्थात, तो अजूनही आपल्या वडिलांइतके नाव कमावू शकलेला नाही. पण, त्याने अनेक शानदार चित्रपटांमध्ये चांगले काम केले आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिषेक बच्चनने 2007 मध्ये बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न केले. या जोडप्याला आराध्या बच्चन ही मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT