Bholaa Vs Dasara Esakal
मनोरंजन

Bholaa Vs Dasara: आयपीएलचा बसला फटका? अजयचा 'भोला' डब्यात तर नानीच्या 'दसरा'ने कमावले इतके कोटी..

पाचव्या दिवशी ना भोला बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला, ना साऊथच्या दसरा चित्रपटाची जादू चालली. सोमवारी दोन्ही चित्रपटांनी खूपच कमी कमाई केली आहे.

Vaishali Patil

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड आणि टॉलिवूड असा सामना पहायला मिळत आहे. कारण एकिकडे सुपरस्टार अजय देवगणचा 'भोला' तर दुसरीकडे साउथस्टार नानीचा 'दसरा'. रामनवमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार एंट्री तर केली. 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा पहिला वीकेंड संपला आहे.

तगडी स्टारकास्ट, चांगले कथानक योग्य दिग्दर्शन असूनही हे चित्रपट प्रेक्षकांना थेअटरमध्ये आकर्षित करु शकले नाही. आता दोन्ही चित्रपटांची अवस्था बिकट दिसत आहे. दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या पहिल्या सोमवारी फारच कमी कमाई केली आहे.

त्यातच सध्या आयपीएल मोठ्या दणक्यात सुरु आहे. आयपीएलची क्रेझ तर लहानांपासून मोठ्यापर्यंत कायम आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कामाईला आयपीएलचा फटका बसला की काय अशीही चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावर नजर टाकूया.

'दसरा'ने बॉक्स ऑफिसवर 23.5 कोटींची कमाई केली, तेव्हा या चित्रपटाची कमाई आणखी वाढू शकते, असं मानले जात होते. मात्र, चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. sacnilk च्या अंदाजानुसार, पहिल्या सोमवारी म्हणजेच पाचव्या दिवशी नानीच्या चित्रपटाने 4 कोटींचा गल्ला जमवला आहे.

अजय देवगणच्या भोलाबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या तीन दिवसाच्या तुलनेत रविवारी चौथ्या दिवशी सुट्टी असल्याने कमाईत वाढ झाली. मात्र, पाचव्या दिवशीही चित्रपटाची जादू चालू शकली नाही. सुरुवातीच्या वृत्तानुसार, सोमवारचे कलेक्शन सुमारे 5 कोटी आहे, जे नानीच्या चित्रपटापेक्षा जास्त आहे.

भोलाचे ओपनिंग डे कलेक्शन 11.2 कोटी होते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 7.4 कोटी आणि 12.2 कोटी. आणि त्यानंतर चौथ्या दिवशी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई 13.48 कोटी होती.

सोमवारच्या अंदाजे आकडेवारीनंतर भोला ५० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 49.28 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. तर 'दसरा'ने आधीच 50 कोटींचा आकडा पार केला आहे. पाचव्या दिवसाच्या व्यवसायासह या चित्रपटाची एकूण कमाई 61.65 कोटीच्या जवळपास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT