Actor Armaan Kohli WARNED By HC To Pay ₹50 Lakh In 2018 Assault Case  SAKAL
मनोरंजन

Arman Kohli Arrested: गर्लफ्रेंडचे ५० लाख थकवले, अरमान कोहली वर अटकेची टांगती तलवार कायम?

Devendra Jadhav

Arman Kohli Arrested News: बॉलीवूड अभिनेता आणि बिग बॉस फेम अरमान कोहली हा त्याच्या अभिनयामुूळे कमी तर वादांमुळे जास्त चर्चेत असतो. ड्रग्जपासून ते गर्लफ्रेंडला मारहाण करण्यापर्यंत अरमानवर अनेक खटले कोर्टात सुरू आहेत.

एक्स गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, एकतर एक्स गर्लफ्रेंडला पैसे द्या नाहीतर तुरुंगात जा. जाणून घ्या काय आहे प्रकरण

(Actor Armaan Kohli WARNED By HC To Pay ₹50 Lakh In 2018 Assault Case)

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 2018 सालचे.. जेव्हा अरमान कोहलीची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने त्याच्यावर केस दाखल केली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत.

एकतर, अभिनेत्याने एक्स गर्लफ्रेंड नीरूला ५० लाख रुपये देऊन तोडगा काढावा अन्यथा तुरुंगात शिक्षा भोगण्यास तयार राहावे.

सध्या या प्रकरणी अभिनेत्याची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, कोर्टाने अभिनेत्याच्या वकिलाला त्याचा पर्याय स्पष्ट करण्यासाठी १८ जुलैपर्यंत वेळ दिला आहे.

नीरू रंधावाने २०१८ मध्ये अरमान कोहलीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अरमानला कलम ३२३, ५०४ आणि ५०६ कलमअंतर्गत अटक करण्यात आली होती.

तक्रारीत नीरूने सांगितले होते की, ती आणि अरमान तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघे मुंबईतील सांताक्रूझ फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. अभिनेत्याने तिला पायऱ्यांवरून खाली ढकलले आणि तिचे डोके भिंतीवर आदळले.

त्यावेळी कोर्टाने अरमान कोहलीला असे एफिडेवेट सादर करण्यास सांगितले होते की, तो असे पुन्हा करणार नाही आणि नीरूला 50 लाख रुपये देईल. पण अभिनेत्याने तसे केले नाही.

आता पुन्हा नीरूने न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी मात्र अरमानने पैसे थकवले आणि कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं नाही तर मात्र त्याला तुरुंगाची हवा खायला लागणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT