Harish Rai Cancer News Harish Rai Cancer News
मनोरंजन

KGF मधील अभिनेत्याला कर्करोग; उपचारासाठी नव्हते पैसे, आता...

पैशांअभावी कॅन्सरची शस्त्रक्रिया लांबणीवर टाकली

सकाळ डिजिटल टीम

Harish Rai Cancer News यशचा ब्लॉकबस्टर चित्रपट KGF १ आणि २ मध्ये दिसलेला अभिनेता हरीश राय याने मोठा खुलासा केला आहे. हरीशने एका मुलाखतीत सांगितले की, तो घशाच्या कर्करोगाशी लढत आहे. कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते हरीश राय यांनी सांगितले की, KGF २ च्या शूटिंगदरम्यान या आजाराचा सामना करावा लागला होता. घशाची सूज लपविण्यासाठी दाढी वाढवली होती. यूट्यूबरला मुलाखत देताना हरीश रायने आजाराबद्दल सांगितले.

कधीकधी परिस्थिती दयाळू असते तर कधी तुमच्यापासून सर्व गोष्टी हिसकावून घेते. नशीबापासून वाचता येत नाही. तीन वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त आहे. केजीएफमध्ये काम करताना मोठी दाढी ठेवणे हे यामागील एक कारण होते. दाढी ठेवून गळ्यावर आलेली सूज लपवण्याचा प्रयत्न केला, असे हरीश रायने सांगितले.

पैशांअभावी कॅन्सरची शस्त्रक्रिया लांबणीवर टाकली होती. मी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होतो. परंतु, आता आजाराच्या चौथ्या टप्प्यात पोहोचलो आहे. परिस्थिती खूप वाईट झाली आहे. चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतील लोकांना मदत मागण्यासाठी व्हिडिओही बनवला आहे. परंतु, व्हिडिओ पोस्ट करण्याचे धाडस करू शकलो नाही, असेही हरीश रायने सांगितले.

KGF १ आणि २ मध्ये हरीश रायने कासिम चाचाची भूमिका साकारली आहे. कासिम हा रॉकीच्या (यश) वडिलांसारखा आहे. जो त्याला वाढवण्यास मदत करतो. हा भारतातील सर्वांत यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. २०१८ मध्ये चित्रपटाचा पहिला भाग आला होता. KGF Chapter २ ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे १,२०० कोटींची कमाई केली. अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आणि नवीन विक्रम रचला.

२५ वर्षांपासून कन्नड सिनेमाचा भाग

दिग्दर्शक प्रशांत नीलच्या चित्रपटाने एसएस राजामौलीच्या आरआरआरलाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले. यशच्या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे ८६० कोटींची कमाई केली होती. ज्यामध्ये हिंदी आवृत्तीने सुमारे ४३५ कोटी कमावले होते. अभिनेता हरीश राय २५ वर्षांपासून कन्नड सिनेमाचा भाग आहे. केजीएफशिवाय बंगलोर अंडरवर्ल्ड, दन दना दन आणि नन्ना कानासिना हुवे चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT