Actor-critic Kamal R. Khan KRK Arrested in Mumbai, Serious Allegation Against Salman SAKAL
मनोरंजन

KRK Arrested: अभिनेता - समीक्षक कमाल आर. खानला मुंबईत अटक, सलमानवर केला गंभीर आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण

कमाल आर. खानला मुंबईत अटक करण्यात आलीय, नेमकं प्रकरण काय?

Devendra Jadhav

KRK kamal r khan Arrested News: अभिनेता - समीक्षक कमाल आर. खान जो के.आर.के. नावाने लोकप्रिय आहे त्याला अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येतेय. कमाल एक फिल्म समीक्षक आणि अभिनेता आहे.

के.आर.के. हा फिल्म समीक्षक म्हणून लोकप्रिय आहे. तो अनेकदा बॉलिवूड सिनेमांची विडंबनात्मक समीक्षा करत असतो. अटक झाल्यावर के.आर.के.ने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. वाचा संपूर्ण प्रकरण

अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल आर खान याला 2016 च्या एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली आहे. के.आर.केने आपल्या X हँडलवर ही बातमी शेअर केली.

त्याने ट्विट केलंय की, “मी गेल्या एक वर्षापासून मुंबईत आहे. आणि मी माझ्या सर्व न्यायालयीन तारखांना नियमितपणे उपस्थित राहतो. आज मी नवीन वर्षासाठी दुबईला जाणार होतो. पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी 2016 च्या एका प्रकरणात वॉन्टेड आहे."

के.आर. केने पुढे सलमान खानचा उल्लेख करत म्हटलंय, "सलमान खान म्हणतोय की त्याचा #Tiger3 हा चित्रपट माझ्यामुळे फ्लॉप झाला आहे. पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात कोणत्याही परिस्थितीत माझा मृत्यू झाला तर तुम्हा सर्वांना कळले पाहिजे की तो खून आहे. आणि तुम्हाला माहित आहे, यासाठी कोण जबाबदार आहे!."

कमाल आर खानला कायदेशीर अडचणींचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये त्याला दोनदा अटक करण्यात आली होती. सुरुवातीला, दिवंगत अभिनेते इरफान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल कथित वादग्रस्त ट्विट शेअर केल्याबद्दल त्याच्यावर आरोप झाले. नंतर सप्टेंबरमध्ये, त्याला पुन्हा अटक करण्यात आली, यावेळी त्याच्या फिटनेस ट्रेनरवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: सुसंस्कृत समाजात ‘बुलडोझर न्याय’ मान्य नाही; डीवाय चंद्रचूड यांनी आपल्या शेवटच्या निकालात योगी सरकारला फटकारले

२४ चेंडूवर १२० धावांचा पाऊस; ट्वेंटी-२० इतिहासातील वादळी खेळी, संघाच्या २०३ धावांत एकटीच्या १५० धावा, Video

Smartphone Tips : मोबाईल वापरताना सतत गरम होतोय? पटकन करून घ्या हे काम,नाहीतर होईल मोठे नुकसान

Vijay Wadettiwar : थापा मारणाऱ्या महायुतीला सत्तेतून खाली खेचा,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे बल्लारपुरात आवाहन

Akola West Assembly Election : विजय खेचून आणणे सोपे नाही....अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात घमासान

SCROLL FOR NEXT