मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पडणारे अभिनेते दिग्दर्शक पराग बेडेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झोपेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने रंगभूमीवर मोठी शोककळा पसरली आहे.
(actor director Parag Bedekar Passes Away at age of 48)
पराग शेवटचा श्वासापर्यंत रंगभूमीवर सक्रिय होते. अनेक नाट्य स्पर्धा, कार्यशाळा या माध्यमातून त्या युवा रंगकर्मींशीही जोडलेले होते. त्यांनी स्वतः 'यदा कदाचित', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', 'लाली लीला', 'पोपटपंची', 'सारे प्रवासी घडीचे' या दमदार नाटकांमध्ये अभिनय केला आहे.
यासोबतच 'आभाळमाया', 'चारचौघी', 'एक झुंड वादळाशी', 'कुंकू' अशा मालिकांमधूनही ते झळकले आहेत. ठाण्या जिल्ह्यात त्यांनी मोठे सांस्कृतिक कार्य केले आहे. अनेक नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. मनोरंजन विश्वात त्यांचा चांगला नावलौकिक होता. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.