Amol Kolhe health update: अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी गंभीर घटना घडली होती. कराड येथे 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांचा अपघात झाला होता. यावेळी यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. आता त्यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट आली असून त्यांनी स्वतः पोस्ट शेयर करत याबाबत माहिती दिली आहे .
(actor dr Amol Kolhe health update after he injured in karad shivputra sambhaji marathi drama play )
सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे महाराष्ट्र भरात जोरदार प्रयोग सुरू आहेत. औरंगाबाद , कोल्हापूरनंतर आता हा दौरा कराड मध्ये आला होता. पण यावेळी कराड मध्ये प्रयोग सुरू असताना अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली होती.
रविवारी ३० एप्रिल रोजी, रात्री कराड येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोग सुरू होता. सगळं काही सुरळीत पार पडत होते पण अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एन्ट्री होत असतानाच घोड्याचा पाय दुमडला गेला. ज्यामध्ये अमोल कोल्हे घोड्यावरून खाली कोसळले. यामुळे त्यांच्या पाठीला जबर मार बसला. त्यानंतर त्यांनी प्रमोपचार घेऊन प्रयोग सुरू ठेवला.
पण त्यांना झालेली दुखापत मोठी असल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले. त्यामुळे १ मे महाराष्ट्र दिनाचा प्रयोग करून ते रुग्णालयात दाखल झाले. आता रुग्णालयातूनच त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्यांचा रुग्णालयातील फोटो त्यांनी शेयर केला आहे. सोबतच प्रकृती स्थिर असल्याचे म्हंटले आहे. अमोल कोल्हे लिहितात की, ''काळजी करण्यासारखे काही नाही.. पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती... परंतु दुखापत फार गंभीर नाही.. लवकरच भेटू " 11 मे ते 16 मे" हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे *"शिवपुत्र संभाजी"* महानाट्य!!! '' असे अशा शब्दात कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.