actor hemnat dhome shared post on uddhav thackeray sakal
मनोरंजन

तुम्हाला अलविदा म्हणताना.. उद्धव ठाकरेंसाठी हेमंत ढोमेची भावूक पोस्ट..

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोरंजन विश्वातून कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

नीलेश अडसूळ

cm uddhav thackeray : गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अखेर या राजकीय नाट्यावर काल पडदा पडला. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.२९) फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली. तसेच त्यांनी आपल्या मंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सुपुर्द केले. यावेळी अनिल परब, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी, निलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. या राजीनाम्या मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. (Hemant Dhome Tweet on Uddhav Thackeray)

लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे (hemant dhome) कायमच विविध विषयांवर लिहीत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने बंडखोर आमदारांवर एक खोचक टीका केली होती. 'आम्ही असं बंड केलं की आमची आई कलथ्याने चटका द्यायची..' असे ट्विट त्याने केले होते. त्यानंतर थेट कालच्या राजकीय गोंधळावर तो बोलला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारख्या शांत आणि संयमी माणूस त्या पदावरून बाजूला झालेला कलाकारांना आवडलेल नाही. प्रत्येकजन या संदर्भात व्यक्त होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत आहेत. अशीच काहीशी अवस्था हेमंत ढोमेची आहे.

'धन्यवाद उद्धव ठाकरे. तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. करोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार…' अशा प्रकारचं ट्विट हेमंतने केलं आहे.' अशा शब्दात त्याने ट्विट करत उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

गेले काही दिवस सुरु असलेल्या बंडाच्या राजकारणावर काल (बुध.२९) सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन आपण राजीनामा देत असल्याचे कळवले. त्यानंतर विविध स्तरातून उद्धव ठाकरे यांना समर्थन मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT