बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) आपल्या सिनेमांपेक्षा अधिक राजकारणात नाक खुपसून जी काही मुक्ताफळ उधळते यामुळे अधिक चर्चेत येते. आता कंगनानं पुन्हा एका वादात उडी मारली अन् लगोलग त्याची चर्चा रंगायला लागली. भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राहिलेल्या नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यासंदर्भात कंगनानं तिचं समर्थन केलंय. कंगनाने नुपूर शर्माला पाठिंबा देताना लोकशाहीवर भाष्य केलं आहे. आता यासंदर्भात थोडं सांगायचं झालं तर नुपूर शर्मांच्या(Nupur Sharma) त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर केवळ भारत सरकारच नाही तर त्यांच्या स्वतःच्या पक्षाने म्हणजे भाजपानेही चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे,नुपूरला तिच्या मनातले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी तिला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी धमकावलंय,दटावलंय ते सगळं मी पाहिलंय. जेव्हा प्रश्न हिंदू देवतांना अपमानित करण्याचा असतो तेव्हा आपण थेट कोर्टात जातो. मग कमीत कमी आता अस करू नका.
कंगनानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''हे अफगाणिस्तान नाही. आपल्याकडे सर्वसामान्यांनी निवडून दिलेलं सरकार आहे. आणि त्याला आपण 'लोकशाही' म्हणतो. हे फक्त त्यांच्यासाठी मी लिहितेय जे लोक सारखं ही गोष्ट विसरतात. भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक देशांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला होता, यानंतर लगेच नुपूर शर्मांना भाजपानंBJP) पक्षातून निलंबित केलं. या मुद्द्यावरनं खूप वाद याआधीच झाला आहे आणि नुपूर यांच्या वक्त्व्यावर भाजपाच नाही तर भारत सरकारनंही आपला राग दर्शवला आहे. भारत सरकारनं म्हटलं आहे की,''असं वक्तव्य करणारे 'फ्रिज एलिमेंट' म्हणजे देशाला तोडणारी लोकं असतात''.
कंगनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर नुकताच प्रदर्शित झालेला तिचा 'धाकड' सिनेमा बॉक्सऑफिसवर सपाटून आपटला,अर्थात फ्लॉपचा शिक्का त्याच्यावर बसला आहे. आता कंगना आगामी 'तेजस' सिनेमात आपल्याला दिसणार आहे. ज्यामध्ये ती भारतीय हवाईदलाच्या फायटर पायलटची भूमिका साकारताना आपल्याला दिसेल. याव्यतिरिक्त कंगनानं आपल्या आगामी 'इमर्जेंसी' या सिनेमाचं शूटिंग देखील सुरू केलं आहे,ज्यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.