actor kiran mane on eknath shinde revolt  sakal
मनोरंजन

Eknath Shinde : किरण मानेंनी सांगितलं बंडामागील 'मोठं कारण'

अभिनेता किरण माने यांनी समाज मध्यमांवर आपले ही मत व्यक्त केले आहे.

नीलेश अडसूळ

Kiran Mane on Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधलेला जनतेशी संवाद या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडांचं कारण काय?, ते नाराज का आहेत? असे प्रश्न उपस्थित झाले असतानाच अभिनेता किरण माने या बंडांमागचे कारण सांगितलंय. भाजपाला साथ देण्यामागे ईडी आणि अटकेची भीती ही दोन प्रमुख कारणं आहेत, असं किरण मानेंनी म्हटलंय.

किरण माने म्हणतात, 'ईडीचा बडगा.. ही सगळ्यात मोठ्ठे कारण आहे. पोस्टमध्ये असलेल्या कुरबुरी फक्त शिवसेनेतच नाही, तर सर्व पक्षात आहेत. राष्ट्रवादीत तर भरपूर आहेत. तीन तीन वेगवगळे गट आहेत. तिथे काँग्रेसमध्येही असेच आहे. अगदी आप मध्येही कुरबुरी आहेत. हार्दिक पटेल कॉँग्रेस सोडून गेला तेव्हा साधारणपणे अशीच कारणं होती. भाजपाला साथ देणाऱ्या सगळ्यांच 'मूळ' कारण 'अटकेची भीती' हे आहे. मजबूरी को समझना चाहीए. दहा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे कुणीतरी जोशी म्हणून आहेत त्यांना इडीची नोटिस गेल्याची छोटीशी बातमी होती, ती दुर्लक्षित करून चालणार नाही.' (Shiv Sena ED Money Laundering Case)

kiran mane comment on ED and maharashtra politics

माने यांनी थेट ईडीकडे बोट दाखवलंय. याच्या मुळाशी भाजप असल्याचा थेट निशाणा त्यांनी साधला आहे. सोशल मीडिया वरील एका पोस्ट वर त्यांनी ही कमेंट केली आहे. त्यांची ही कमेंट सध्या भरपूर व्हायरल होत आहे. एवढेच नव्हते तर किरण माने यांनी बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरही भाष्य करणारी एक पोस्ट केली होती. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे कौतुक केले होते.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विमानतळाबाहेरील व्हायरल व्हिडिओबाबतही त्यांनी भाष्य केले होते. ‘आमदार' या पदाच्या अब्रूचा पार पंचनामा चाल्लाय. नाय नाय, याआधीबी बंडखोरी झालीय की महाराष्ट्रात. लै वेळा झालीय. पन झालीय तवा खुलेआम झालीय. हितं मराठी मातीत र्‍हाऊन. तोंडावर. स्वखुशीनं. पन ही काय अवस्था बघतोय ! आरारारारा. भटकी जनावरं धरून कोंडवाड्यात भरावीत तशी अवस्था झालीय एकेकाची’, अशी पोस्ट त्यांनी केली होती.

एकनाथ शिंदेंनी काय म्हटले होते?

जनादेश भाजपसमवेत सत्तास्थापन करण्याचा असतानाही तो मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले. तुरूंगामध्ये असणाऱ्या आणि दाऊदशी संबंध असलेल्यांना पाठिशी का घातले जाते आहे? असा सवाल आम्हाला केला जातो आहे. हे आघाडीचे सरकार सोडून पुन्हा भाजपसोबत जाण्याची मागणी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सध्या गुवाहाटी येथील हॉटेलात बंडखोर आमदारांसोबत तळ ठोकून असलेल्या शिंदे यांनी पत्रक जारी केले असून आम्हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT