Actor Kiran Mane has Shared a Number plate of Australian Friend on which Jai Bhim has written SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: 'जयभीम'... ऑस्ट्रेलियातल्या दोस्ताची बीएमडब्ल्यूवर नंबर प्लेट, किरण मानेंची खास पोस्ट

किरण मानेंनी खास पोस्ट करत ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या व्यक्तीची खास कहाणी सांगितली आहे

Devendra Jadhav

किरण मानेंनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अमित भुतांगे या तरुणाची गोष्ट शेअर केलीय. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झालीय.

किरण माने लिहीतात, "'जयभीम'... कसं थाटात आन् टेचात ल्हिवलंय नंबरप्लेटवर. ऑस्ट्रेलियात र्‍हानार्‍या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू हाय ही भावांनो !

...मला आलेल्या फ्रेन्ड रिक्वेस्ट मी शक्यतो तपासून ॲक्सेप्ट करतो. अशीच एक रिक्वेस्ट आली. त्यावर ह्यो नादखुळा फोटो दिसला. नवल वाटलं. पोस्ट पाहिली, तर आंबेडकर जयंतीची ही पोस्ट होती. त्यावर कॅप्शन लिहीलीवती, 'बापाचा दिवस नसतो. आपला प्रत्येक दिवस त्या बापामुळेच असतो.'... क्युरीऑसिटी वाढली. या भन्नाट मानसाशी संपर्क साधला. दूर असला तरी हा आपला हमदम, हम-नफ़स निघनार याची खात्री होतीच, ती पक्की झाली. म्हन्ला, 'तुम्ही समविचारी आहात, म्हणून मैत्रीचा हात पुढं केला."

(Actor Kiran Mane has Shared a Number plate of Australian Friend on which Jai Bhim has written)

किरण माने पुढे लिहीतात. "अमित भुतांगे ! नागपूरचा. सध्या ॲडलेड इथं फिजीओथेरपीस्ट म्हणून नांव कमावतोय. तिथंच स्थायिक झालाय. निव्वळ टॅलेंटच्या बळावर मोठा झालाय... ऐश्वर्यसंपन्न झालाय... पन तरीबी आपली पाळंमुळं इसरलेला नाय. आपल्या शिक्षनाचा पाया ज्याच्यामुळं घातला गेला, त्या बापाला काळजात जपून ठेवलंय. 'आपन खातो त्या भाकरीवरच नाय, तर ब्रेड-बटर, पिझ्झा-बर्गरवरबी बाबासायबांचीच सही हाय' याची जानीव ठेवलीय."

किरण माने लिहीतात, "हे प्रेम फक्त गाडीवर 'जयभीम' ल्हीन्यापुरतं नाय बरं का... आपल्यापैकी बर्‍याचजनांना वाटंल, त्यात काय विशेष? लै जन अशी महामानवांची नांवं गाडीवर लिहीत्यात. म्हनून त्यापुढं जाऊन या मानसाविषयी मी जानून घेतलं, आन् नंतर खर्‍या अर्थानं भारावलो. आज ऑस्ट्रेलियात व्यवसाय भरभराटीच्या शिखरावर असूनबी अमितनं बाबासाहेबांचा आदर्श घेत, सामाजिक भान जपलंय. इंडीयामधल्या उपेक्षित, वंचित समाजातल्या हुशार पोरांना हेरून, त्यांना करीयर गायडन्स करनं... उच्च शिक्षनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये संधी मिळवुन देनं, अशी कामं मनापास्नं आनि आनंदानं करतो हा आपला दोस्त !"

किरण माने शेवटी लिहीतात, "शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे 'खरेखुरे' विचार ज्यानं मनामेंदूत मुरवून घेतलेत, तो कुठल्याही क्षेत्रात जाऊदेत... कुठल्याही प्रांतात जाऊदेत... कुठल्याही देशात जाऊदेत... न डरता, न लाजता, कुनाचीबी भिडभाड न ठेवता आपल्या महामानवांच्या विचारांचा दरवळ पसरवनार... हे जग सुंदर करनार !सलाम मित्रा अमित. लब्यू लैच. जय शिवराय... जय भीम !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT