Kiran Mane : गेली काही दिवस किरण माने यांची भलतीच हवा आहे. सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे. त्यांचा चाहतावर्ग जबरदस्त वाढला आहे.
किरण माने यांची खासियत म्हणजे ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. त्यांच्या पोस्ट हा कायमच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. आज मात्र त्यांनी थेट तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेऊन एक पोस्ट लिहिली आहे.
नुकतीच तुकाराम महाराज बीज झाली. यानिमित्ताने किरण यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष, आलेले अनुभव आणि तुकाराम महाराजांनी त्यातून कसं बळ दिलं यावर ते बोलले आहेत.
(actor Kiran Mane shared post on tukaram maharaj beej and said his bad experience politics in industry and how tukaram abhang helps him)
किरण माने म्हणतात, ''बा तुकोबाराया... तुझ्या सावलीत यिल त्याला "न सरे ऐसे दान" देनारा तू... मग लेकराला कमी करनारंयस व्हय? तू मला भरभरून दिलंयस माऊली, आभाळभर दिलंयस. अभिनेता म्हनून माझ्यावर प्रेम करनार्या माझ्या चाहत्यांना मी तुझं विचारधन शेअर करतो. ते माझ्या पोस्टस् वाचून तुला अभ्यासायला सुरूवात करत्यात, तवा तर आनंद होतोच... पन माझ्यावर टीका करनारे, मला ट्रोल करतानाबी कवाकवा जाणूनबुजून तुझ्या अभंगाचा आधार घेत्यात, तवा त्यांचा राग न येता, हरखून काळीज सुपाएवढं होतं ! "निंदक तो परउपकारी.. काय वर्णूं त्याची थोरी !" असं म्हनावं वाटतं.''
''...मागच्या एका वर्षात माझ्या भावविश्वात आणि करीयरमध्ये लै खतरनाक उलथापालथी झाल्या. लढलो जिगरा लावून, पन खरंतर आतनं जीव घाबराघुबरा झालावता... "तुका म्हणे माझे दचकले मन... वाटे वायांवीण श्रम गेला" अशी अवस्था व्हायची.. पन दूसर्या बाजूला मी तुझा हात घट्ट पकडला होता... हिंमत आन् ताकद एकवटून झुंजत होतो.. शत्रूची एकेक चाल उधळून लावत होतो. "तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे... अवघियांचे काळे केले तोंड !"
बिगबाॅसमधी जायच्या महिनाभर आधी देहूला तुझ्या पायांवर डोकं ठेवायला आलोवतो. लै बेकार मनस्थिती होती. मनापास्नं, जीव लावून कामाचा आनंद घेत असतानाच, कटकारस्थानी लोकांनी माझ्यासमोरनं कॅमेरा हिरावून घेतल्याला सहा महिने उलटून गेलेवते. "जीवना वेगळी मासोळी.. तैसा तुका म्हणे तळमळी" अशी अवस्था झालीवती. गाथा बुडवल्यावर अन्नपानी सोडून तू ज्या शिळेवर बसलावतास, त्या शिळेकडं बघताना डोळं भरून आलं. अचानक मनात आलं, तू ज्या भयाण, 'पर्वताएवढ्या' वेदनेतनं गेलायस, त्यापुढं माझं दु:ख म्हन्जे 'जवा'एवढं ! तिथनं उठलो आन् भिडलो जगन्याला.
बर्याचजणांना मी संपलो असं वाटत असतानाच माझ्या आयुष्यानं अशी उसळी घेतली...अशी भरारी घेतली की वाटलं, "याचसाठी केला होता अट्टाहास !. पूर्वी फेसबुकवरनं तुझ्या अभंगांचं निरूपण करताना हजारो लोक ते वाचतात, समजुन घेतात, प्रेरणा घेतात याचं लै समाधान असायचं. नंतर त्यापुढं एक पायरी वर जाऊन 'बिगबाॅस'च्या घरातल्या कॅमेर्यातनं रोज लाख्खो, कोट्यावधी लोकांपर्यन्त तुझे अभंग पोचवताना छाती अभिमानानं भरून यायला लागली !
''माऊली, आता माझं आयुष्य एका नव्याच वाटेवर आणून ठेवलंयस तू. खडबडीत, काट्याकुट्यांची वाट संपली. गाडी मेनरोडला लागलीय.. मेगा हायवे थोडा नजरेच्या टप्प्यात आलाय. तिथं पोचायलाबी कमी संघर्ष नाय, पन आता मी ढिला पडत नस्तोय. मनापास्नं, प्रामाणिकपणानं आणि महत्त्वाचं म्हन्जे 'अभ्यासून' काम करायचा तुझा सल्ला इसरनार नाय. जीवाचं रान करीन, रक्ताचं पानी करीन.'' अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.