Actor Mayank Madhur threatens legal action against makers of Kangana Ranaut's Tejas for non-payment of dues SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut Tejas: कंगनाचा 'तेजस' अडचणीत, भाजप सल्लागाराने कारवाईची दिली धमकी

Devendra Jadhav

Kangana Ranaut Tejas Controversy News: बॉलीवुडची क्वीन कंगना रणौतचा आगामी तेजस सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. कंगना रणौतचा टिकू वेड्स शेरु सिनेमा बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला.

कंगनाने काही दिवसांपुर्वी इमर्जन्सी या आगामी सिनेमाची झलक शेअर केली. पण काहीच दिवसांपुर्वी कंगनाने तिच्या आगामी तेजस सिनेमाची घोषणा केली त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

पण कंगनाचा हा सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कंगनाच्या सिनेमाच्या मेकर्सवर सिनेमातल्या अभिनेत्याने पैसे थकबाकीचा आरोप केलाय.

(Actor Mayank Madhur threatens legal action against makers of Kangana Ranaut's Tejas for non-payment of dues)

तेजस चित्रपटासाठी काम केलेल्या मयंक मधुरने निर्माता त्याचे पैसे देत नसल्याचा दावा केला आहे. मयंक राजकीय सल्लागार असून भाजपसाठी काम करतात.

सर्वेश मेवाडा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर तेजस चित्रपटात कंगना रनोटने एअरफोर्स ऑफिसरची भूमिका साकारली होती.

दरम्यान, मयंक मधुरने बॉलिवूड हंगामाशी संवाद साधला आहे. कंगना रणौतच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी मिळवण्यात मयंकने टीमची मदत केल्याचा दावा केला.

यामध्ये हवाई दलाचे तळ तसेच दिल्ली, मुरादाबाद आणि लखनौ सारख्या ठिकाणांचा समावेश आहे जिथे गेल्या 2 वर्षांपासून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु तो अयशस्वी झाला होता.

याशिवाय दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांनी त्याला वचन दिले होते की, त्याच्यासाठी चित्रपटात 15 मिनिटांची भूमिका ठेवेल.

याचे स्पष्टीकरण देताना मयंक मधुर सांगतात, "माझी भूमिका लहान होत गेली. त्यानंतर, मला 1 किंवा 2 मिनिटांसाठी सिनेमात भुमिका करायला सांगीतले. मी त्यांना सांगितले की मला त्यात रस नाही."

मयंक मधुरने असेही सांगितले की, कंगना राणौतने चित्रपट रिलीज होण्यापूर्वी मला पैसे मिळतील असे वचन दिले होते. आता तीही निर्मात्याकडे बोट दाखवत आहे. याविषयी मयंक माजी सरन्यायाधीशांशी बोललाय.

त्याच वेळी, त्यांनी पीएमओ, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयाशी देखील बोलले आहे जेणेकरून अनेक राज्यांमधून अटक वॉरंट जारी करता येईल.

कायदेशीर प्रक्रियेनुसार सर्व काही केले जाईल, असेही ते म्हणाले. हा चित्रपट तेजस गिलची कथा सांगणार आहे. तेजस हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असून टायगर श्रॉफच्या गणपत चित्रपटाशी टक्कर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

Terrorist Attack: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी हल्ला, 6 जवानांचा मृत्यू तर 11 जण जखमी

UPSC Exam Paper leaked : यूपीएससी परीक्षेत आणखी एक घोटाळा! मुख्य परीक्षेचा पेपर फुटला?

Relationships Tips : एक बेवफा है ! जोडीदार तुमचा फक्त वापर करून घेतोय का? कसे ओळखाल

SCROLL FOR NEXT