actor milind gawali shared post on his wife deepa birthday and talks about kundali sakal
मनोरंजन

Milind Gawali: चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये.. मिलिंद गवळींच्या पोस्टनं वेधलं लक्ष..

गवळी म्हणाले, आता कुणी पत्रिका पाहत असतील का नाही हेही माहीत नाही.

नीलेश अडसूळ

Milind Gawali News: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.

त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. पन्नाशी उलटून गेली तरीही मिलिंद गवळी आजही फिट आणि हँडसम आहेत. शिवाय ते सोशल मीडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असतात.

आज त्यांनी एक खास पोस्ट केली आहे. की पोस्ट आहे त्यांच्या बायकोसाठी आहे. बायकोच्या वाढदिवसा निमित्ताने आज ते व्यक्त झाले आहेत. तेव्हा पाहूया, नेमकं काय म्हणाले ते..

(actor milind gawali shared post on his wife deepa birthday and talks about kundali)

मिलिंद गवळी यांनी आपल्या बायकोच्या वाढदिवासानिमित्त एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये पत्नी दीपा यांचे काही खास फोटो आहेच, शिवाय एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. बायकोची जन्मतारीख आणि खरा वाढदिवस याविषयी त्यांनी आज लिहिले आहे.

मिलिंद गवळी लिहितात की, ''दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला सुख ,समृद्धी ,आरोग्य, यश मिळो. सदैव आनंदी रहा, खुश रहा , नेहमी सारखं सतत हसत रहा .
अशी ईश्वरचरणी प्रार्थना, आम्हाला अशीच inspire करत रहा, तुझी चिकाटी, जिद्द, energy infectious आहे. अशीच रहा !''

''आणि नशीबवान आहेस तू , तुला दोन वाढदिवस साजरे करायला मिळतात, वर्षानुवर्ष वाढदिवस ९ नऊ मे May या तारखेला साजरा केला जातो, खरं तिचा जन्म दहा१० मे चा आहे. पण मग का तिचा वाढदिवस एक दिवस आधी ९ लाल केला जातो,''


हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढे ते लिहितात, ''कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे रंजूताई चा वाढदिवस नऊ मे ला असतो, मग मोठ्या बहिणीबरोबर या शेंडेफळाचा म्हणजेच दिपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा,''

''आणि वर्षां वर्ष हे असंच घडत होतं, आणि मग ती स्वतः विसरून गेली होती की तिचा जन्म दहा मे चा आहे. म्हणून यावर्षी मी मुद्दामून तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. एकाच दिवशी दोघांच celebration करण्या पेक्षा दोन वेगवेगळे सेलिब्रेशनस करायला काय हरकत आहे. किंवा दोन्ही दिवशी ते साजरे करूया.''

''खूप श्या लोकांच्या जन्म तारखेचा घोळ असतो, आणि आधीच्या पिढीचा तर खूप घोळ होता , म्हणजे आमच्या पुरकर काकांची जन्मतारीख वेगळी आणि शाळेतल्या दाखल्यामध्ये जन्मतारीख वेगळी, शाळेत ऍडमिशन साठी वय पूर्ण नसतं म्हणून तारीख बदलायची पूर्वी एक पद्धत होती,
मुलाचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं , पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे.''

''बऱ्याचशा लोकांचा जन्म तारखे बरोबर जन्म वेळेचा सुद्धा खूप घोळ झाला आहे.
चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहीलं जायचं.
आत्ताच्या पिढीचा तसा घोळ नसावा असं मला वाटतं. आता Precise and exact time of birth दिला जात असावा. पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का याचीच मला
शंका वाटते.''

''कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगले हि असतात. डबल सेलिब्रेशन करायला मिळातं. तर दीपा तुला दोन दोन वाढदिवसाच्या डबल शुभेच्छा.. '' अशी पोस्ट मिलिंद गवळी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT