Payal Ghosh-Irfan Pathan Relationship  Esakal
मनोरंजन

Payal Ghosh: 'गंभीर मला वारंवार मिस कॉल द्यायचा ..',शमीला प्रपोज करणाऱ्या पायलचे धक्कादायक खुलासे! या खेळाडूला केलं 5 वर्षे डेट

Vaishali Patil

Payal Ghosh and Irfan Pathan Relationship: दक्षिण भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी पायल घोष ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या तिच्या दाव्यांची चर्चा होत आहे.

तिने अनेक ट्विट करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिने भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि गौतम गंभीर यांच्याबाबत अनेक गंभीर खुलासे केले आहे. क्रिकेटर इरफान पठाणबद्दल तिने धक्कादायक दावा केला आहे.

अलिकडेच पायल घोषने खुलासा केला आहे की तिने इरफान पठाणला पाच वर्षांपासून डेट केले आहे. इतकच नाही तर माजी क्रिकेटर आणि नेता गौतम गंभीरबद्दल दावा केला की, गौतम गंभीर तिला मिस्ड कॉल द्यायचा. या ट्विटनंतर पायल आता पुन्हा चर्चेत आली आहे आणि नेटकरी तिला आता ट्रोल करत आहेत.

पायलने पहिल्या ट्विटमध्ये क्रिकेटर इरफान पठाणसोबतचा एक फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये पायल लिहिते की, 'आमचं ब्रेकअप झाल्यापासून मी आजारी पडले होते. त्यानंतर मी अनेक वर्ष काम करू शकले नाही. तो एकटाच मुलगा होता ज्यावर मी प्रेम केले. यानंतर मी कोणावर प्रेम करु शकले नाही.'

इतकच नाही तर पायलने माजी क्रिकेटर गौतम गंभीर बाबतदेखील धक्कादायर खुलासा केले आहे.

पायलने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'गौतम गंभीर मला नेहमी मिस्ड कॉल द्यायचा. इरफानला हे चांगलंच माहीत होतं. तो माझे सर्व कॉल चेक करायचा त्याने हे माझ्यासमोरच युसूफ भाई, हार्दिक आणि कृणाल पंड्यालाही सांगितले होते. जेव्हा मी पुण्यात इरफानला भेटायला गेले होते.'

पण केवळ या ट्विटमुळेच नाही तर पायल यापुर्वी वर्ल्ड कप वेळीही चर्चेत आली होती. तिने वर्ल्ड कप 2023 दरम्यान मोहम्मद शमीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

त्यावेळी पायलने तिच्या एक्स अकाऊंटवर ट्विट करत लिहिले होते की, 'शमी, तू तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.'

सध्या सोशल मिडियावर पायलची खुपच चर्चा रंगली आहे. मात्र काही वेळातच पायलने तिची पोस्ट एक्स अकाऊंटवरुन डिलिट केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 5 : 'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : मनीष सिसोदीयांनी रोहित पवार यांना भावी शिक्षणमंत्री म्हणून संबोधलं

SCROLL FOR NEXT