बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारणारा कलाकार राजपाल यादवने (rajpal yadav) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या नावाबाबत खुलासा केला आहे. हंगामा, भूल भुलैया, चुप चुप के आणि फिर हेरा फेरी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा राजपाल त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं नेहमी मनोरंजन करतो. गेल्या मार्च महिन्यामध्ये राजपाल 50 वर्षांचा झाला. राजपालने त्याचे पुढील आयुष्य त्याच्या वडिलांना समर्पित करण्याचा निर्णय घेताला आहे. आत्तापर्यंत त्याचे चाहते त्याला राजपाल यादव म्हणून ओळखत होतो. पण आता आपले नाव बदलून राजपाल नौरंग यादव असे केले आहे.(actor rajpal yadav told the reason for changing the name)
राजपालने सांगितले नाव बदलण्यामागचे कारण
50 व्या वाढदिवशी राजपालने त्याचे नाव बदलून वडिलांचे नाव स्विकारण्याचा निर्णय घेतला. नाव बदलण्याच्या निर्णयाबाबत आपल्या पत्नीशी बोलताना राजपाल म्हणाला, “गेली कित्येक वर्षे मी माझे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगलो आहे. पण आता मी माझे पुढील आयुष्य माझ्या वडिलांना समर्पित करणार आहे.'
एका मुलाखतीमध्ये राजपालने 'मुंगेरी के भाई नौरंगीलाल' हा शो त्यांना का प्रिय आहे त्याबद्दल सांगितले. त्यावेळी तो म्हणाला, 'या टीव्ही कार्यक्रमात, मी माझ्या वडिलांच्या नावाची म्हणजेच नौरंगी ही भूमिका साकारली होती. यामुळे मुंगेरी के भाई नौरंगीलाल हा शो नेहमीच माझ्यासाठी विशेष राहील.'
मुलाखतीमध्ये राजपालने त्याच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, 'जेव्हा मी चौथीमध्ये होतो. तेव्हा माझे मित्र गावातील झाडाचे फळ तोडत असत. एकेदिवशी,जेव्हा मी झाडावर चढण्याचा प्रयत्न करीत होतो तेव्हा जोरात वारा आला आणि माझा तोल गेला. माझा पाय झाडाच्या फांदीमध्ये अडकला होता. मी झाडावर लटकलो होतो. मला झाडाच्या घाली उतरवण्यासाठी माझ्या मित्रांनी माझ्या वडिलांना बोलावले होते. जेव्हा माझ्या वडिलांनी मला झाडावर पाहिले तेव्हा ते मला खूप ओरडले होते.' राजपाल लवकरच हंगामा- 2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.