SwatantryaVeer Savarkar Esakal
मनोरंजन

येरवडा कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेला रणदीप हुड्डाने दाखवला हिरवा झेंडा!

आज रणदीप पुण्यात काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेत सहभागी झाला.

Vaishali Patil

SwatantryaVeer Savarkar Actor Randeep Hooda: सध्या बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या आगामी सिनेमा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. तर आज रणदीप पुण्यात काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेत सहभागी झाला.

त्याने येरवडा मध्यवर्ती कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हातात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मुर्ती घेऊन रणदीप या यात्रेत सहभागी झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. आज या ऐतिहासिक घटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याने ही यात्रा काढण्यात आली होती.

यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना अभिनेता रणदीप हुड्डाने सांगितले की "आजचा दिवस ऐतिहासिक होता जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. ते येथून सुटका झाल्यानंतर रत्नागीरीला गेले होते.

आज या घटनेला आज 100 वर्षे पूर्ण झाली...आम्ही प्रतीकात्मकरित्या त्यांची तुरुंगातून सुटका करणार आहोत. असे स्वातंत्र सेनानी ज्यांच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. त्यासाठी काम करणे आणि मी याचा भाग झाल्याचा खूप आनंद होत आहे. ..."

"मला आशा आहे की माझ्या चित्रपटाद्वारे त्याच्याबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळावी. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी काय बलिदान केले हे लोकांना कळावं. लोकांनी त्यांच्या बद्दल जास्त वाचलेले नाही.

जर लोकांनी वाचलं आणि माझा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना हे कळाले की त्यांची चुकीची प्रतिमा जगासमोर दाखवण्यात आली आहे." यावेळी त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने घोषणाही दिल्या.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये झाले आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची असून उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजेंड स्टुडिओ, निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान यांनी केली आहे.

तर चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली आहे. भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदीराम यांसारख्या अनेक क्रांतिकारकांवर वीर सावरकरांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचेही या चित्रपटाच्या टिझरमध्ये सांगण्यात आले आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT