सावरकरांनी मात्र सकल हिंदू एकत्र करण्यासाठी आयुष्य वेचले. ते काम कधीच विसरता कामा नये.
सांगली : हिंदू धर्मातील जातीच्या भिंती पाडून टाकल्या पाहिजेत, ही शिकवण स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांनी दिली आहे. मात्र, सध्या याच जातीच्या भिंती हिंदू धर्माला (Hinduism) कलंक ठरत आहेत, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी येथे व्यक्त केले.
सांगलीत कुमार भिडे व नितीन भिडे यांनी सांगली शिक्षण संस्थेच्या पटवर्धन हायस्कूलला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र भेट दिले. या कार्यक्रमात पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, नीला भिडे, उपाध्यक्ष रवींद्र देवधर, शाला समिती अध्यक्ष विजय भिडे, मुख्याध्यापक नारायण पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुपवाडचे चित्रकार विशाल शिंगे यांनी चित्र रेखाटले आहे.
पोक्षे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची सतत बदनामी करण्याचे प्रयत्न गेली ७५ वर्षे होतोय. कोणताही पुरावा नसताना चिखलफेक केली जात आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच सावरकरांचा धडा पुस्तकातून काढला गेला, पण सांगलीत एका शाळेत चित्र लागले ही आनंदाची बाब आहे. पूर्वी ब्राह्मण विरोधात बहुजन असा वाद निर्माण केला होता.
सध्या बहुजनांतच जातीच्या भिंती उभ्या करण्याचे चुकीचे काम सुरू आहे. सावरकरांनी मात्र सकल हिंदू एकत्र करण्यासाठी आयुष्य वेचले. ते काम कधीच विसरता कामा नये. प्रत्येकाशी माणुसकीने वागायला सांगितले, हेच खरे हिंदुत्व आहे. त्यासाठी शंभर टक्के नास्तिक होण्याची परवानगी हेच हिंदुत्वाचे सौंदर्य आहे. हिंदुत्व म्हणजेच माणुसकीचा धर्म आहे.’’
ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात सध्या उपोषण सुरू आहेत. हा मार्ग चुकीचा नाही. मात्र प्रभु राम, श्री कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी कधीही उपोषण केले नाही. कोणतेही उपोषण यशस्वी होऊ शकत नाही. कारण त्यासाठी राजा सुसंस्कृत लागतो. श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोनच सुसंस्कृत राजे आतापर्यंत होऊन गेले. त्यानंतर कोणतेही उपोषण यशस्वी झाले नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.