मुंबई - कोरोनाची महामारी आणि त्यावेळी सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी लोकांना सहकार्य केलं. यात काही अभिनेत्यांची नावं सांगायची झाल्यास अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अभिनेत्री प्रीती झिंटा, अनुष्का शर्मा यांचे नाव घेता येईल. त्यांनी लॉकडाऊनमध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. यासगळ्यात अभिनेता सोनू सूदनं केलेली मदत सर्वांच्या चर्चेचा विषय बनली होती. तो नेहमीच आपल्या मदतशील स्वभावासाठी सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील त्यानं आपला मोठा फॅन क्लब तयार केला आहे. त्याच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशनही झाले आहे. असा हा मदतशील सोनू चर्चेत आला आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याच्या काही कार्यालयांवर ईडीनं सर्वे केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
त्यानिमित्तानं सोनूची पत्नीही चर्चेत आली आहे. यापूर्वी ती फारशी कधीही लाईमलाईट मध्ये आलेली नाही. सोनूप्रमाणेच ती देखील मदतशील स्वभावाची आहे. सोनूच्या काही कार्यालयांवर इडीनं चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर मोठ्या तर्क वितर्कांना उधाण आले होते यासगळ्यात सोनुच्या वेगवेगळ्या कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्याच्याशी संबंधित काही कागदपत्रांची पडताळणीही करण्यात आली आहे. सोनूच्या चाहत्यांनी या परिस्थितीवर वेगळ्या पद्धतीनं भाष्य केलं आहे. सरकारचे काही छुपे अजेंडे यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी सोनूवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोनुच्या एकुण सहा कार्यालयांवर छापा टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार चौकशीतून सोनू सूदच्या संपत्तीची आणि त्याच्या उत्पन्नाची माहिती अधिकाऱ्यांना हवी असल्याचे सांगण्यात आले आहे. यासगळ्यात सोनूच्या पत्नीच्या नावाची चर्चा आहे. ती देखील बॉलीवूडमधील मोठी निर्माती आहे. मात्र ती सोनू इतकी प्रसिद्धही नाही. त्याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद असं आहे. ती एक फिल्म निर्माती आहे. कोरोनाच्या काळात सोनू सुद हा गरिबांचा मसीहा झाला होता. त्यावेळी अशी एक माहिती समोर आली होती की, त्यानं आपली प्रॉपर्टी गहाण टाकून लोकांना मदत केली होती. मीडिया रिपोर्टसच्या माहितीनुसार, 21 वर्ष पूर्ण करणाऱा सोनु हा बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो राजकारणात प्रवेश करणार अशीही चर्चा होती. सोनुची संपत्ती ही 130 कोटी रुपये (17 मिलियन डॉलर) एवढी आहे.
सोनाली ही एमबीए असून ती सध्या फिल्म मेकरच्या भूमिकेत आहे. तिनं शक्ति सागर नावाचे प्रॉडक्शन हाऊस तयार केले आहे. जे तिनं तिच्या वडिलांच्या नावावरून ठेवलं आहे. सोनू आणि सोनालीला दोन मुलं आहेत. त्यांची मुलं ही देखील फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जातात. सोनूनं आपल्या परिवारासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.