actor sumeet raghvan tweet on aarey carshed and suggested to who are protesting against aarey instead of just standing with placards and hugging trees  sakal
मनोरंजन

झाडांना मिठी मारून आंदोलन करण्यापेक्षा.. सुमीत राघवन आरे आंदोलकांवर भडकला..

गेले काही दिवस 'आरे वाचवा' मोहिमेतील आंदोलकांवर अभिनेता सुमीत राघवन सातत्याने टीका करत आहे.

नीलेश अडसूळ

save the aarye : महाराष्ट्रातला राजकीय गोंधळ आता कुठे शांत झाला असतानाच 'आरे'चा वाद चिघळू लागला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यावरण प्रेमींच्या अंदोलनानंतर आरे येथे होणाऱ्या मेट्रो 3 कारशेडला स्थगिती दिली गेली. परंतु आता फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येताच त्यांनी पुन्हा आरे येथेच कारशेड होणार असल्याचे जाहीर केले. याचे पडसाद म्हणून पुन्हा एकदा 'आरे बचाव' आंदोलनाने जोर घेतला आहे. पण दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन (sumeet raghvan) मात्रा आरे आंदोलकांच्या विरोधात आहे. मध्यंतरीच त्याने 'कारशेड वही बनेगा' म्हणत ट्विट केले होते. अशातच आता त्याने पुन्हा एकदा ट्विट करत आरे आंदोलकांवर निशाणा साधला आहे.

(actor sumeet raghvan tweet on aarey carshed and suggested to who are protesting against aarey instead of just standing with placards and hugging trees..)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय रद्द करून कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो 3’चं कारशेड आरेतच होणार अशी घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. त्यांनंतर लगेचच पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची मोर्चे बांधणी केली. परंतु या आंदोलनाला सुमीत राघवनने विरोध दर्शवला. 'एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा, जीव, वेळ.. काही किंमत आहे की नाही. आरेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. कारशेड वही बनेगा. म्हणजे कुठे, तर आरेतच’, असे ट्विट सुमीतने केले होते.

त्यानंतर आरे मध्ये आंदोलन झाले त्यावेळी सुमीतने पुन्हा ट्विट केले. त्यावेळी सुमीत म्हणाला, 'बस्स्स्स्स… चर्चेचा अंत झाला. सगळ्या पर्यावरणप्रेमींना सांगा, हे घ्या एक एक झाड आणि आपल्या सोसायटीमध्ये लावा. खूप झाला ड्रामा,’ असंही त्याने ट्विटरवर लिहिलं.

(sumeet raghvan on aarey)

आता सुमीत जरा स्पष्टच बोलला आहे. तो म्हणतो, 'कारशेड समर्थक देखील पर्यावरणाच्या विरोधात नाही, हे सत्य जाणून घ्या. आता जागं होण्याची वेळ आली आहे. तुम्हाला आणि तुमच्या पिढीला योग्य वाटेल ते सांगून खोटं काही पसरवू नका. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील संजय कांबळे यांना भेटा, म्हणजे कळेल. आंदोलकांनी नुसतं फलक घेऊन, झाडाला मिठी मारून त्यांचं प्रेम दाखवण्यापेक्षा जरा स्वतःच्या खिशालते पैसे खर्च करून पर्यावरणासाठी काहीतरी भरीव करायला सांगा. समाजाचा आणि प्राण्यांचं भलं करा. आपलं योगदान देऊन महाराष्ट्र सरकारचा भार थोडा हलका करा.

पुढे त्याने सांगितले आहे की, 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुम्ही पिंजऱ्यातील प्राणी दत्तक घेऊ शकता. त्या प्राण्याचा एका वर्षाचा अन्न आणि वैद्यकीय खर्च तुम्ही देऊ शकता. मी तारा (2018) आणि आतिश (2019) अशी दोन बिबट्यांची पिल्लं दत्तक घेतली आहेत. त्यांनी राष्ट्रीय उद्यानातील संजय कांबळे यांना टॅग करून लिहिलंय की तुम्हीही याबाबत जनजागृती करू शकाल तर मला खूप आवडेल.' आरे कारशेड ची एकूण परिस्थिती पाहता हा वाद अजून चिघळणार असे दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT