Viraf Patel, Saloni Khanna Instagram
मनोरंजन

उधाराची साडी, रबर बँडची अंगठी; १५० रुपयांत पार पडलं अभिनेत्याचं लग्न

'पैसा वसूल, शादी कबूल'

स्वाती वेमूल

सेलिब्रिटींचं लग्न म्हटलं की धामधूम, रोषणाई, महागडे कपडे आणि नाचगाण्याची धमाल हे सर्व चित्र डोळ्यांसमोर येतं. मात्र एका सेलिब्रिटी जोडीने या सर्व महागड्या आणि अर्थहीन गोष्टींना छेद देत अत्यंत अनोख्या पद्धतीने लग्न केलंय. 'नामकरण' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराफ पटेलने Viraf Patel गर्लफ्रेंड सलोनी खन्नाशी Saloni Khanna कोर्ट मॅरेज केलं. अवघ्या एका तासात पार पडलेल्या या लग्नात अनेक मजेशीर गोष्टी घडल्या. या लग्नसोहळ्यात वधू सलोनीने उधार घेतलेली साडी नेसली होती, विराफने तिला लग्नाची अंगठी म्हणून रबर बँडची अंगठी दिली आणि हा संपूर्ण लग्नसोहळा फक्त १५० रुपयांत पार पडला. नातेवाईक आणि कुटुंबीयांनी झूम कॉलमधून वर-वधूला आशीर्वाद दिले. (actor Viraf Patel ties the knot with Saloni Khanna gives her a rubber band instead of wedding ring)

या लग्नाचे फोटो विराफ आणि सलोनीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'एक परफेक्ट लग्न. रबर बँडची अंगठी, उधार घेतलेली साडी, अँडीबॉडीज म्हणून साक्षीदार, शेवटच्या मिनिटाला मैत्रिणींनी केलेली माझी तयारी आणि झूम कॉलवर मित्रपरिवार. एक तासात अवघ्या १५० रुपयांत पार पडलेलं लग्न. पैसा वसूल, शादी कबूल', असं मजेशीर कॅप्शन सलोनीने या फोटोंना दिलं आहे. "सध्या लॉकडाउन असल्यामुळे मला लग्नाची अंगठीसुद्धा विकत घेता आली नाही. म्हणून मी रबर बँडची अंगठी तिला दिली. नशिब त्यासाठी तिने मला मारलं नाही", असं विराफ म्हणाला.

हेही वाचा : लस घेताना घाबरलेल्या अंकिताने घेतलं देवाचं नाव; चाहते म्हणाले..

विराफ आणि सलोनी यांची भेट एका ऑनलाइन शोदरम्यान झाली. या दोघांमध्ये अल्पावधीतच चांगली मैत्री झाली आणि या २० फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. विराफने 'नामकरण', 'एक बूंद इश्क', 'कोी जाने ना' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. तर सलोनीने 'द रायकर केस' या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT