मनोरंजन

आशाताईंच्यारुपी मी माझी आई गमावलीय : अलका कुबल

उमेश बांबरे

सातारा : ''आई माझी काळूबाई'' या मालिकेत भूमिका करण्यासाठी आशाताईंनी होकार दिला, तेव्हा मी देखील खूप आनंदीत झाले होते. आमच्या दोघींमध्ये जवळपास ३५ वर्षाचे आई आणि मुलीसारखे घट्टनाते निर्माण झाले होते. मालिकेत काम करताना त्यांच्यात अनोखी ऊर्जा पहायला मिळायची. त्या नेहमी आनंदी असायच्या. वेळप्रसंगी त्या आमच्याकडे लहान मुलासारख्या आवडीच्या गोष्टींसाठी हट्ट करायच्या. जे-जे शक्य झाले ते-ते आम्ही केले. मात्र......असे सांगताना अभिनेत्री अलका कुबल यांना अश्रू अनावर झाले.  

''आई माझी काळूबाई'' या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज साताऱ्यात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. येथील कैलास स्मशानभूमी येथे आशाताईंचा अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल भावनाविवश झाल्या. त्या म्हणाल्या, गेली अडीच महिने आम्ही साता-यात शूटिंग करतोय. माझी आई काळूबाई या मालिकेची चित्रिकरण सुरू होण्यापूर्वी आमच्या सर्वांच्या कोरोनाच्या तपासण्या झाल्या होत्या. यामध्ये आशाताईंची देखील कोविड चाचणी झाली होती. सर्वांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मस्त पैकी चित्रिकरण झाले. सर्वकाही आनंदी वातावरणात सुरू होते. 

आशाताई स्वत:चीही काळजी घेत होत्या. त्या कधीही आजारी नव्हत्या. त्यांना कोणतीही गोळी किंवा औषध सुरू नव्हते. मात्र, या महामारीने त्याचं असं जाणं खूपच धक्कादायक आहे. आमच्या टीममध्ये बावीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आम्हाला समजले. त्यापैकी जे तरूण होते ते उपचारानंतर  ठणठणीत झाले. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन आम्ही सगळे चित्रिकरण केले. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रश्न आमच्यापर्यंत आला नाही. सोमवारी आशाताई खूप आनंदी होत्या. पण, अचानक त्यांना कोरोनाचा संसर्ग होईल, असं काही होईल वाटलचं नव्हत. जेव्हा त्यांना ताप खोकला सुरू झाला. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली. तेव्हा काही जवळच्या डॉक्टरांनी आम्हाला त्यांना साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सुचविले. त्यानुसार आम्ही त्यांना तेथे दाखल केले. 

त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. पण, कालपर्यंत त्या खूप चांगल्या होत्या. जेव्हा आम्हाला डॉक्टरांनी आम्हाला त्या जास्त वेळ आपल्यासोबत राहणार नाहीत. त्यांचा श्वासोच्छवास कमी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे असं काही घडेल वाटले नव्हते. हे सर्व आम्हाला फारचं धक्कादायक होतं. जेव्हा मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पीपीई किट घालून भेटायला गेले. त्यावेळी कोविडमुळे ब-याच समस्या येत होत्या. आत जायचं नाही, काचेमधूनच बोलायचं, असे असतानाही मी त्यांना जाऊन पाहिले. 

माझी आई काळुबाई चित्रिकरणाची चाैकशी हाेणार?
 
आमच्या दोघींत जवळजवळ ३५ वर्षांचे आई-मुलीचं नात तयार झालं होतं. त्या खूप हट्टी होत्या. लहानमुलांसारखं हट्टीपणाने कधी हे हवं आहे, कधी ते हवं आहे, असे त्या म्हणायच्या. कधी कधी पहाटे तीन वाजता मला कॉल करायच्या. मला स्पेशल ज्यूस पाहिजे, म्हणायच्या. पण, कधी-कधी कोविडमुळं हे देखील मिळणं कठिण होतं. मला समाधान वाटतंय, आम्हा जे जे शक्य झालं ते ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला, असे सांगत असताना अलका कबुल यांना अश्रू अनावर झाले.

अगदी चालता-बोलता त्या गेल्या. वाचल्या असत्या तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. माझ्या आयुष्यात एक खंत राहिली की आम्ही इतके प्रयत्न केले तरी त्या वाचू शकल्या नाहीत. गेली चार दिवस आम्ही दिवस-रात्र त्यांच्यासोबत आहोत. पण, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही एवढं मात्र खरं आहे. माझ्या घरच्या  कोणाला बोलवू नका, सगळं काही इथं साता-यातच करा, इतकच आशाताईंनी शेवटी सांगितले. आम्ही त्यांच्या घरच्यांना निरोप पाठविला पण त्यांनीही साता-यातच  विधी करा, असे सांगितले. कोरोनामुळे त्यांच्या घरचेही येऊ शकले नाहीत. शासनाच्या नियमानुसार आशाताईंचा सगळा विधी साताऱ्यात पार पाडण्यात आला. 

कोविड पेशंट असल्याने त्या प्रमाणे विधी आवरुन आम्ही मुंबईला रवाना होणार आहोत. आम्ही त्यांनी वाचवू शकलो नाही, पण त्याचं काहीतरी थोडसं करु शकलो याचं समाधान आहे. कोरोनाच्या बाबतीत प्रत्येकाने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. या रोगाचा कसा प्रसार होईल सांगता येत नाही, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो, असे सांगून अलका कुबल म्हणाल्या, सर्वांनी काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाझर, मास्क या गोष्टी जाणीवपूर्वक पाळा. कोविडची जाणीव होताच टेस्ट करुन घ्या, आम्हीपण उद्या जावून टेस्ट करणार आहोत, असेही त्यांनी शेवटी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT