actress Ameesha Patel surrendered in Ranchi civil court for the cheque bounce fraud case  SAKAL
मनोरंजन

Amisha Patel: गदर मधील सकिना पोहोचली कोर्टात, तोंड लपवण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Amisha Patel News: सकीना आणि तारा सिंह यांचा 'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच अमिषा पटेलने रांचीच्या दिवाणी न्यायालयात सरेंडर केले आहे. यावेळी ती दुपट्ट्याने चेहरा लपवताना दिसली.

मात्र, तिला पुन्हा एकदा यावे लागेल. कारण न्यायालयाने तिला 21 जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर ती आज 17 जून रोजी सरेंडर करण्यासाठी न्यायालयात पोहोचली. आता 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण 21 तारखेला अमिशा आली नाही तर जामीन रद्दही होऊ शकतो.

(actress Ameesha Patel surrendered in Ranchi civil court for the cheque bounce fraud case)

प्रकरण काय?

खरे तर प्रकरण 2018 सालचे आहे. अभिनेत्री अमिषा पटेलवर अडीच कोटींच्या फसवणुकीचा आरोप होता. रांचीच्या अजय कुमारने चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकावल्याचा आरोप अमिशावर केला होता.

एवढेच नाही तर अभिनेत्रीसह तिचा बिझनेस पार्टनर कुणालवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय झारखंडचा निर्माता आहे.

'देसी मॅजिक' चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अमिषा पटेलने आपल्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा दावा त्याने केला होता. चित्रपट पूर्ण झाल्यावर ती व्याजावर परत करेल असं अमिशाने सांगितलं होतं. पण तिने पैसे परत केले नाहीत.

अमिशाने दिलेले चेक बाऊन्स झाले

'देसी मॅजिक' या चित्रपटाचे शूटिंग 2013 मध्ये सुरू झाले होते. पण सिनेमा आजवर रिलीज मात्र झाला नाही. अशा परिस्थितीत अजयने अमिशाकडे पैशांची मागणी केली.

पण अमिशाने ते परत केले नाहीत. नंतर अमिशाने दोन चेक अजयला दिले. एक 2.5 कोटींसाठी आणि दुसरा 50 लाखांसाठी. पण हे चेक बाउन्स झाले.

फसवणूक झाल्याप्रकरणी अजय दिवाणी न्यायालयात पोहोचला, आणि त्याने अमिशा विरोधात तक्रार केली. त्यामुळे कोर्टाकडून अमिशावर अनेकदा समन्स बजावण्यात आले. पण ती कधीच कोर्टात गेली नाही. पण आता वॉरंट जारी झाले असून ती सरेंडर झाली.

अमिशा पटेलला सध्या जामीन मिळाला आहे. 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला.

मात्र 21 जून रोजी ती पुन्हा हजर झाली नाही तर न्यायालय तिचा बाँड फेटाळणार असून तिला पुन्हा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय तिला अटकही होऊ शकते असं सूत्रांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT