actress amruta subhash shared special post for subodh bhave sakal
मनोरंजन

अमृता सुभाषची सुबोधसाठी खास पोस्ट, म्हणाली.. आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात

अभिनेत्री अमृता सुभाषने नुकतीच सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यानंतर तिने ही पोस्ट लिहिली आहे.

नीलेश अडसूळ

आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. (Amruta Subhash) अमृताने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अमृता सध्या 'पुनश्च हनिमून' या नाटकामुळे चर्चेत आहे. तसेच तिच्या 'सास बहू आचार' लाही प्रचंड यश मिळाले. अमृता कायम विविध विषयांवर व्यक्त होत असते. आज मात्र ती अभिनेता सुबोध भावे विषयी व्यक्त झाली आहे. 'बस बाई बाई' या कार्यक्रमानंतर तिने ही पोस्ट लिहिली आहे. (actress amruta subhash shared special post for subodh bhave)

नुकतीच अमृताने सुबोध भावे (subodh bhave)च्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यानंतर अमृताने सुबोध भावेसाठी एक पोस्ट लिहिली आहे. अमृता म्हणते की, 'सुबोध भावे.. माझा जवळचा मित्र. माझा प्रत्येक प्रोजेक्ट पाहिलेला, अगदी पुरुषोत्तम करंडक पासून ते ‘सास बहु आचार’ सर्व पाहिलेला, माझ्या आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात माझी साथ दिलेला. अप्रतिम कलाकार आणि लाखमोलाचा माणूस. त्यानं ‘बस बाई बस’ या कार्यक्रमासाठी माझ्याशी साधलेला हा संवाद म्हणूनच माझ्यासाठी अनमोल आहे. मला झी मराठीनं ‘अवघाची संसार’मुळे घरोघरी पोहोचवलं, या चॅनलची मी सदैव ऋणी राहीन. या चॅनेलवर होणारं हे कौतुक माझ्यासाठी माहेरपणाच्या कौतुकाची भावना देणारं आहे.”

अमृताची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. ती झी मराठी वरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार पंकजा मुंडे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अशा अनेक दिग्गज महिला सहभागी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT