Anjali Patil Dumped 5 lakh Scam: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. या फसवणुकीला सामान्य माणूसच नाही तर सिनेविश्वातील कलाकारही बळी ठरत आहेत.
सध्या 'ड्रग इन पार्सल' पद्धत वापरुन अनेकांची फसवणुक होत आहे. हिंदी - मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्री अंजली पाटीलही अशा फसवणुकीचा बळी ठरली आहे. संपूर्ण प्रकार वाचा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फसवणूक करणाऱ्याने त्याच्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे भासवून अंजलीची ५.७९ लाख रुपयांची फसवणूक केली. एवढेच नाही तर त्याने अंजलीला तीन बँक खात्यांमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात गोवले.
रिपोर्ट्सनुसार, 28 डिसेंबर रोजी अभिनेत्रीला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्याने स्वतःची ओळख दीपक शर्मा म्हणून केली, जो FedEx कुरिअर कंपनीचा कर्मचारी होता. त्याने अंजलीला सांगितले की, तिच्या नावाने तैवानला जाणाऱ्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज होते, त्यामुळे कस्टम विभागाने हे पार्सल जप्त केले.
डीएन नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या अहवालानुसार, पार्सलमध्ये अभिनेत्रीच्या आधार कार्डची प्रत सापडल्याचा दावा फसवणूक करणाऱ्याने केला आहे.
पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, फसवणूक करणाऱ्याने अभिनेत्रीला सांगितले की, तिच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे. यानंतर त्यांनी अभिनेत्रीला याप्रकरणी मुंबई गुन्हे विभागाशी बोलण्याचा सल्ला दिला.
पुढे फोन कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर काही वेळातच अंजलीला स्काईपवर एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने स्वत:ची ओळख बॅनर्जी अशी करून दिली, ते मुंबई गुन्हे विभागाचे अधिकारी होते.
त्याने अंजलीचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडले. बॅनर्जी म्हणाले की, तिचे आधार कार्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या तीन बँक खात्यांशी जोडले गेले होते.
त्याच्या पडताळणी प्रक्रियेसाठी, त्याने 96,525 रुपये प्रक्रिया शुल्क मागितले. अंजलीने फसवणूक करणाऱ्याच्या नंबरवर ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले.
"FedEx कंपनी ग्राहकांना विनंती केल्याशिवाय त्यांची वैयक्तिक माहिती अनोळखी फोन कॉल, मेल किंवा ईमेलद्वारे मागून घेत नाही.कोणत्याही व्यक्तीला कोणतेही संशयास्पद फोन कॉल किंवा संदेश प्राप्त झाल्यास, त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती देऊ नये असा सल्ला दिला जातो. असं झाल्यास त्यांनी ताबडतोब परिसरातील स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकार्यांशी संपर्क साधावा किंवा भारत सरकारच्या सायबर क्राइम विभागाला कळवावे."असा खुलासा FedEx कंपनीने केलाय.
यानंतर फसवणूक करणार्याने दावा केला की, ज्या खात्यांमध्ये तिचे आधार कार्ड मनी लाँड्रिंगसाठी वापरले गेले होते त्या बँक अधिकाऱ्यांचा या घोटाळ्यात सहभाग असू शकतो, ज्याच्या चौकशीसाठी त्याने आणखी 4,83,291 रुपये मागितले.
कोणताही आढेवेढे न घेता अंजलीने तिच्या खात्यातून फसवणूक करणाऱ्याच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात पैसे पाठवले. अशाप्रकारे अंजलीची तब्बल ५ लाखांची फसवणुक झाली.
यानंतर अभिनेत्रीने हा संपूर्ण प्रकार तिच्या घरमालकाला सांगितला, ज्यांना या प्रकरणात फसवणूक झाल्याचा संशय आहे. यानंतर अंजलीलाही आपण फसवणुकीची शिकार झाल्याचे लक्षात आले.
पुढे अभिनेत्रीने 29 डिसेंबरला पोलिसांत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.