actress deepali sayed police complaint against former personal assistant bhausaheb shinde at oshiwara police station a case has been registered for defamation sakal
मनोरंजन

Deepali Sayed: बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री दिपाली सय्यद यांची स्वीय सहाय्यकाविरोधात पोलिसांत तक्रार..

दिपाली सय्यद यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नीलेश अडसूळ

Deepali Sayyed : अभिनेत्री आणि राजकारणी अशी दुहेरी ओळख असणाऱ्या दीपाली सय्यद सर्वांना चांगल्याच परिचित आहेत. गेली काही वर्ष अभिनयापेक्षा राजकरणाकडे त्या अधिक सक्रिय झाल्याने सतत त्या चर्चेत असतात. कधी वादग्रस्त विधान तर कधी पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी त्या सोशलमीडियावर बऱ्याच सक्रिय असतात.

आज मात्र अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांकडून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(actress deepali sayed police complaint against former personal assistant bhausaheb shinde at oshiwara police station a case has been registered for defamation)

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानची संबंध आहेत. तसेच त्यांचा अंडरवर्ल्डशी संपर्क असून दुबई, लंडनमध्ये या ठिकाणी त्यांची मालमत्ता आहे, असा आरोप दिपाली यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता.

दीपाली यांच्या सेवाभावी संस्थेचे कामकाज शिंदे 2019 पर्यंत पाहत होते. पण सय्यद यांनी शिंदे यांना 2019 मध्ये कामावरुन काढले होते. त्यानंतर त्यांच्यात आणि दीपाली सय्यद यांच्यामध्ये काहीतरी बिनसले.

त्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यद यांची पोलखोल केली. दिपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच त्यांनी सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

त्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता दिपाली सय्यद यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दिपाली सय्यद म्हणाल्या,"माझ्यावर आणि माझ्या ट्रस्टवर जे आरोप झाले ते अत्यंत चुकीचे आहेत. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना मी माझ्या नावावर लोकांकडून पैसे घेताना पकडलं आहे". 

शिंदे यांनीही मागितली आहे दाद.. - ''राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही असं भाऊसाहेब शिंदे यांचं म्हणणं आहे. दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT