actress Kananga ranaut twitter account gets temporarily restricted 
मनोरंजन

'वायफळ चर्चा, कंगणाचं व्टिटरनं अकाऊंट केलं बंद'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपल्या वाचाळपणासाठी प्रसिध्द असणा-या कंगणाला व्टिटरनं सणसणीत प्रतिसाद दिला आहे. कायम वेगवेगळ्या विषयांवरुन टोकाची मतं व्यक्त करणा-या कंगणाला सोशल मीडियावर फॉलो करणा-यांची संख्याही प्रचंड आहे. गेल्या काही दिवसांपासून तिनं केलेल्या वक्तव्यामुळे समाजात नकारात्मकता तसेच दोन गटात दुही पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. तिनं यापूर्वी व्टिटरवरही टीका केली आहे. अमेरिका निवडणूकीच्यावेळी वेगळी भूमिका घेणा-या व्टिटरवर तिनं निशाणा साधला होता.

आता कंगणाच्या बेतालपणाला तालावर आण्यासाठी व्टिटरनं तिचे अकाऊंट काही काळासाठी बंद केले आहे. याविषयी आगपाखड करताना तिनं लिहिले आहे की, स्वतंत्र असल्याचे सांगणारे आता जॅकच्या जवळ जात आहे. दुसरीकडे माझ्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. ते लोक मला धमकावत आहेत. यावरुन मला एक कळाले की, माझे अकाऊंट आणि व्हर्च्युअल आयडेंटीटी ही कधीही शहीद होऊ शकते. मात्र माझी देशभक्ती चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. मी आता तुमचे जगणं अवघड करुन टाकणार आहे. अशा शब्दांत तिनं आपला राग व्यक्त केला आहे.

कंगणाने व्टिटरचे सीईओ जॅक यांना आपले व्टिट टॅग केले आहे. आणि ज्या लोकांनी कंगणाचे व्टिटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली होती त्यांना तिनं सडेतोड उत्तर दिले आहे. वादग्रस्त वक्तव्ये करणा-या व्टिटरनं कंगणाचे अकाऊंट तात्पुरत्या काही काळासाठी बंद केले आहे. आपल्या विधानांमुळे वादाच्या भोव-यात सापडलेल्या कंगणाने गेल्या वर्षभरापासून अनेकांचा रोष पत्करला आहे. तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वैतागलेल्या काही सेलिब्रेटींसाठी ती डोकेदुखीचा विषय ठरली आहे. कंगणा मात्र आपल्याला कोणी काहीही म्हटलं तरी त्यापासून माघार घ्यायची नाही यावर ठाम असलेली दिसून आली आहे. बुधवारी अखेर कंगणाच्या व्टिटर अकाऊंटवर काही काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. 

तांडव नावाच्या नव्या मालिकेवरुन कंगणानं व्टिट करायला सुरुवात केली होती. त्यावरुन ती दोन दिवसांपासून चर्चेत आहे. त्यानंतर त्या मालिकेच्या दिग्दर्शकानं माफीही मागितली. मात्र त्यानंतरही कंगणानं व्टिट करुन दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांना काही प्रश्न विचारले होते. भगवान श्री कृष्ण यांनीही शिशुपाल यांचे 99 गुन्हे माफ केले होते. त्याच पध्दतीने पहिली शांती मग क्रांती...आता त्यांचे शिर कलम करण्याची वेळ आली आहे. अशा पध्दतीचे व्टिट कंगणाने केले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: राज्यात 38 जागांवर मुस्लिम लोकसंख्या जास्त; मतदारसंघात भाजपचीच सरशी, विक्रमी जागा जिंकल्या

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

SCROLL FOR NEXT