actress Neena Kulkarni grand entry in pratishodh marathi serial on sony marathi sakal
मनोरंजन

Neena Kulkarni: अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची 'या' प्रसिद्ध मालिकेत एन्ट्री! साकारणार..

बऱ्याच वर्षांनी दिसणार छोट्या पडद्याकर..

नीलेश अडसूळ

Pratishodh Marathi serial latest update: सोनी मराठी वाहिनीची 'प्रतिशोध' ही मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आणि काही काळातच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.

निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर हे ममता या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे.

तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष याची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे..

(actress Neena Kulkarni grand entry in pratishodh marathi serial on sony marathi )

मालिकेत आता एन्ट्री झाली आहे शर्मिष्ठा वर्धे यांची. शर्मिष्ठा वर्धे यांच्या भूमिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी पाहायला मिळताहेत . निरनिराळ्या मालिकांतून आपल्या भेटीस येणार्‍या अभिनेत्री नीना कुळकर्णी आता वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शर्मिष्ठा वर्धे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्यांच्या येण्याने दिशा आणि शंतनू यांच्या नात्यात काय अडचणी येणार, हे आता पाहण्यासारखं असेल. कारण शर्मिष्ठा वर्धे या शंतनूच्या आई आहेत.

मालिकेत सुरुवातीपासून शंतनूची आई म्हणजे शर्मिष्ठा वर्दे यांचा उल्लेख आला आहे. शंतनूने वकिलीचा अभ्यासही आपल्या आईकडून प्रेरणा घेऊनच केला आहे. त्यांच्या येण्याने मालिकेत आता काय वेगळी वळणं येणार हे पाहण्याजोगं असेल.

'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. यातील आई ही तृतीयपंथी आहे तर ती दत्तक मुलीला सांभाळते आणि मुलीसारखंन वाढवते असं दाखवण्यात आलं आहे.

ममताच्या भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT