actress neha pendse Jewellery worth 6 lakhs was stolen from the house SAKAL
मनोरंजन

Neha Pendse: अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचे दागिने चोरीला, 'या' जवळच्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडलीय

Devendra Jadhav

Neha Pendse News: अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरातून 6 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेहाचा पती शार्दुल सिंग बायस (४७) याच्याकडे कामावर असलेला ड्रायव्हर रत्नेश झाने पोलिसात ही तक्रार नोंदवल्याचं समजतंय. वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या २३व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली.

कपाटातील दागिने चोरले

रत्नेश झाने तक्रारीत म्हटले आहे की, शार्दुलने 28 डिसेंबर रोजी त्याला चार वर्षांपूर्वी लग्नात भेट म्हणून मिळालेलं सोन्याचं ब्रेसलेट आणि हिऱ्याने जडवलेली अंगठी हरवल्याची माहिती दिली.

शार्दुल हे दागिने सहसा बाहेरच घालतो. त्याने घरी परतल्यावर नोकर सुमित कुमार सोलंकी याच्याकडे हे दागिने दिले. सुमीतने हे दागिने बेडरूमच्या कपाटात ठेवले होते.

सुमितवर आला संशय

सुमित इतर घरातील नोकरांसह कॉम्प्लेक्समध्ये राहतो. घटनेच्या दिवशी शार्दुल बाहेर जाण्याच्या तयारीत असताना कपाटातून दागिने गायब असल्याचे समजले.

घरातील सर्व नोकरांची चौकशी करूनही कोणालाच हरवलेल्या वस्तूंची माहिती नव्हती. त्यावेळी नोकर सुमित घरी नव्हता. शार्दुलने सुमितशी संपर्क साधला असता तो कुलाबा येथे मावशीच्या घरी असल्याचं सांगण्यात आलं.

नोकर सुमितला अटक

अधिक चौकशी केली असता सुमितने दागिने कपाटात ठेवल्याचे सांगितले. मात्र, शार्दुलने शोधाशोध केली असता दागिने कुठेच सापडले नाहीत. सुमितवर संशय आल्याने शार्दुलने त्याला ताबडतोब घरी यायला सांगितलं.

मात्र सुमितने घरी यायला उशीर केला, त्यामुळे शार्दुलचा संशय आणखी वाढला. त्यानंतर शार्दुलचा ड्रायव्हर रत्नेश झाने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी नोकर सुमितला अटक केली आहे, मात्र चोरीचे दागिने अद्याप मिळालेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT