Nupur Alankar Rescued:  Esakal
मनोरंजन

Nupur Alankar Rescued: अभिनय सोडला, केदारनाथना गेली अन् अडकली! लोकप्रिय अभिनेत्रीच्या सुटकेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Nupur Alankar Rescued:  एकेकाळी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नुपूर अलंकार हिने अचानक अभिनय सोडला .

मनोरंजन विश्वसोडून संन्यासी बनलेली नुपूर अलंकार ही अनेक धार्मिक स्थळांना भेटी देत असते. मात्र यावेळी ती केदारनाथ बाबाच्या दर्शनाला गेली आणि तिथेच अडकली. ज्यानंतर तिला आणि बाकिच्या टिमला हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले.

नूपुर ही नुकतीच केदारनाथला भेट देण्यासाठी गेली होती पण रस्त्यात दरड कोसळली आणि ती तिथेच अडकली. दरम्यान चाहत्यांना याची माहित देत नूपुरनं तिच्या बचावाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आणि तिच्यासोबत झालेली घटना सांगितली. नुपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तीन-चार व्हिडिओ शेअर केले आहेत.

पासळ्यात सर्वत्र दरड कोसळण्याच्या घटना या नेहमी घडत असतात. केदारनाथच्या मार्गावरही असाच काहीसा प्रकार घडला. ज्यात नुपूर अडकली.

या व्हिडिओत नुपूर सांगते की, तिने केदारनाथ बाबाचे दर्शन घेतलं आणि येताना मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे रस्त्यात दरड कोसळली. त्यात ती आणि तिच्यासोबत इतरही लोक अडकले. त्याच्या मदतीला तेथील कर्मचारी आलेत आणि त्यांनी तिच्यासह अडकलेल्या लोकांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आली. तिथे एक डिग्री तापमानात असून देवाच्या कृपेने ती वाचली असंही तिने व्हिडिओत सांगितले.

नुपूरने 'शक्तिमान', 'घर की लक्ष्मी बेटियां' आणि 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' सारख्या अनेक हिट मालिकांमध्ये काम केले होते. पण 2022 मध्ये तिने सर्व काही सोडले आणि ती सन्यांसी झाली. आता ती फक्त देवाच्या भक्तीत मग्न राहते. ती देशभरातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेते आणि आशीर्वाद घेते. तिने यासाठी तिचं घरदारही सोडलं आहे. नुपूरही मुंबई सोडून हिमालयात गेली आहे तेव्हा पासून तिचा धार्मिक प्रवास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT