actress payal rohatagi  Team esakal
मनोरंजन

सोसायटीत गुंडगिरी, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक

संबंधित सोसायटीच्या चेअरमननं पायलच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती.

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री पायल (bollywood actress payal rohatagi) रोहतगी पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिच्या विरोधात गोव्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारी पायलला आता पोलिसांनी अटक केली आहे. तिनं आपल्या सोसायटीच्या चेअरमनला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (actress payal rohatgi arrested by ahmedabad police for threatening her society chairperson)

संबंधित सोसायटीच्या चेअरमननं (chairman) पायलच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारी पायल बॉलीवूडमधील मोठी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या हॉटनेससाठीही प्रसिद्ध आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीची सर्वसाधारण मिटींग सुरु होती. त्यात तिचा सोसायटीच्या चेअरमन यांच्याशी वाद झाला होता.

20 जूनला ही मिटींग झाली होती. त्यात चेअरमन यांच्यासहित अनेकांशी पायलनं भांडणं केली. त्यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिनं मुलं सोसायटीमध्ये खेळतात या कारणावरुनही सोसायटीतील लोकांशी भांडणं केली. 2019 मध्ये पायलनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात तिनं नेहरु आणि गांधी (nehru and gandhiji) यांच्यावर बेताल वक्तव्य केलं होत. त्यामुळे तिच्यावर नेटक-यांनी सडकून टीका केली होती.

पायलच्या अशा वागण्यामुळे मुंबई पोलिसांनी तिचे सोशल मीडियाचे अकाऊंट बंद केले होते. मात्र पायलवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. त्यावेळी तिला राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथे अटक केली होती. त्यानंतर तिला कोर्टाकडून जामीनही मिळाला होता. पायलच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती फियर फॅक्टर इंडियाच्या २ मध्ये सहभागी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT