actress prajakta gaikwad left exit the shivputra sambhaji marathi drama know the reason sakal
मनोरंजन

Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडने अमोल कोल्हेंचं 'शिवपुत्र संभाजी' नाटक सोडलं, कारण आलं समोर..

प्राजक्ता या महानाट्यात महाराणी येसुबाईंची भूमिका साकारत होती.

नीलेश अडसूळ

Prajakta Gaikwad News: 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाडला संभाजी मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेमुळे कमालीची लोकप्रियता मिळाली.

या भूमिकेने तिला यश, प्रसिद्धी सगळच मिळवून दिलं. त्यानंतर प्राजक्ता काही मालिकांमध्ये झळकली होती पण त्यातून तिला फारसा सकारात्मक अनुभव आला नाही. असे असले तरी तिचा चाहतावर्ग कमी झालेला नाही.

प्राजक्ता सध्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी नाटकात संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई यांची भूमिका करत होती. पण आता तिनं या नाटकाला रामराम केल्याचे समोर आले आहे. शिवाय त्याचे कारणही आता उघड झाले आहे.

(actress prajakta gaikwad left exit the shivputra sambhaji marathi drama know the reason)

या नाटकात येसुबाईंच्या भूमिके अभिनेत्री स्नेहलता वसईकरची एंट्री झाली आणि प्राजक्ताने हे नाटक सोडल्याचे उघड आले. नाटक सध्या जोरदार प्रतिसादात सुरू असताना तिनं ही भूमिका का घेतली, त्याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या.

कारण येसु बाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड हे समीकरण ठरलेलं होतं. पण तिनं हे महानाट्य सोडल्यानं अनेकांना धक्का बसला. आता त्यामागचे कारणही समोर आले आहे.

प्राजक्ताने नुकतीच एक पोस्ट शेअर केली ज्यावरून तिनं नेमकं का नाटक सोडलं याचा खुलासा झाला आहे. प्राजक्ताने एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती गणपतीची पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका सेट वरचा असून आगामी चित्रपटाचा शुभारंभ करतानाचा हा प्रसंग आहे.

हा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर सर्वांना प्राजक्ताचं नाटक सोडण्या मागचं खर कारण समजलं. प्राजक्ता लवकरच एका नव्या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच हैदराबादमध्ये सुरुवात झाली आहे.

प्राजक्ताच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या सोबत या व्हिडिओमध्ये अभिनेता प्रणव रावराणे देखील दिसत आहे. आता नेमका हा चित्रपट कोणता, कधी प्रदर्शित होणारा, याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT