निक जोनास आणि प्रियांका चोप्रा हे इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक आहेत. पण, आता या जोडीचीही जगातील आवडत्या जोड्यांमध्ये गणना होत आहे. नुकतेच प्रियांका आणि निक रोमला पोहोचले होते. या ट्रीपमधील दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या जोडप्याच्या बाँडिंगवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
निक जोनास आणि प्रियांकाच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा तिच्या नवऱ्याचा हात धरून रोमच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. प्रियांकाने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.
त्यांच्या जोडीसोबतच त्यांची लाइफ स्टाइलही नेहमीच चर्चेत असते. थाई-हाई स्लिट ब्लॅक सिल्क ड्रेसमध्ये प्रियांकाची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या ड्रेसशी मॅच असलेली काळी स्लिंग बॅगही घेतली आहे. देसी गर्लने लांब काळा ओव्हरकोट घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. निक नेहमीप्रमाणेच त्याच्यासोबत मस्त आणि कॅज्युअल स्टाईलमध्ये दिसत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका तिच्या आगामी वेब सीरिज सिटाडेलसाठी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती प्रमोशनसाठी रोममध्ये होती. तिच्यासोबत तिचा पती निकही उपस्थित होता. दोघांनी रोममधील सिटाडेलच्या स्पेशल स्क्रीनिंगलाही हजेरी लावली होती. ही सिरीज 28 एप्रिल रोजी Amazon Prime Videos वर प्रसारित होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.