Actress Radha Sagar Bless With Baby Boy Shared photo viral Esakal
मनोरंजन

Radha Sagar: ' आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला झाले 'पुत्ररत्न'! फोटो शेयर करत दिली गुड न्यूज...

Vaishali Patil

Actress Radha Sagar: 'आई कुठे काय करते', 'सुंदरा मनामध्ये भरली' अशा दर्जेदार मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राधा सागर हिला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आज सकाळी सोशल मीडियावर फोटो शेयर करत अभिनेत्रीने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. 'आई कुठे काय करते' मधील राधा आता खऱ्या आयुष्यातही एका गोंडस मुलाची आई झाली आहे.

लाडक्या लेकाच्या हाताचा फोटो शेयर करत राधाने चिमुकल्यासाठी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये राधा लिहिते,

"आणि आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण:

आम्हाला मुलगा झालाय.. तो येताच त्याने त्याची चमक दाखवायला सुरुवात केली.

असा जादुई मुलगा आहे तो..

जीवनाच्या या नवीन मालिकेत आम्हाला आई आणि वडील म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद !!!

आम्ही खरोखर धन्य आणि वेडसर पालक आहोत..."

राधाने काही दिवसांपुर्वीच एक गोड व्हिडिओ शेयर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना होती. राधाने तिचा पती सागर कुलकर्णी याच्याबरोबर बेबी बंप दाखवत शूट देखील केलं होत. त्याचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता ही गोड बातमी मिळताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून राधा अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ती चंद्रमुखी चित्रपटातून देखील झळकली होती.

राधाने अनेक चित्रपटही काम केले आहे. त्यामुळे खलनायकी भूमिका असो विनोदी काम, राधा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावतेच. आता तिने  गरोदरपणामुळे अभिनयातून ब्रेक घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT