actress raveena tondon karmma calling webseries trailer out now hotstar 26 jan 2024  SAKAL
मनोरंजन

Raveena Tondon: "मी अलिबागची राणी इंद्राणी...", रविनाची आगामी वेबसिरीज 'कर्मा कॉलिंग'चा रहस्यमयी ट्रेलर रिलीज

रवीना टंडनच्या आगामी वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Raveena Tondon Karmma Calling Trailer: रविना टंडन ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री. रविनाने काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या केजीएफ चाप्टर 2 मधून लोकांची चांगलीच पसंती मिळवली.

रविनाच्या आगामी सिरीजची घोषणा झालीय. नाव आहे कर्मा कॉलिंग. या सिरीजमध्ये रविना ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. नुकतंच वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झालाय.

कर्मा कॉलिंगच्या ट्रेलरमध्ये चकचकीत, ग्लॅमर आणि ऐश्वर्याने भरलेले कोठारी साम्राज्य दिसतं. हे एक श्रीमंतांचे जग आहे. परंतु या श्रीमंती जगात अनेक रहस्य दडली आहेत..

Disney+ Hotstar ने त्यांच्या बहुप्रतिक्षित कर्मा कॉलिंग सीरिजचा ट्रेलर लाँच केला आहे. कर्मा कॉलिंग मध्ये अलिबागची राणी इंद्राणी कोठारी (रवीना टंडन) कर्मा तलवार (नम्रता शेठ) शी लढण्यासाठी सज्ज आहे. ट्रेलरमध्ये अनेक रहस्ये दडली आहेत. अल्पावधीतच या ट्रेलरला लोकांनी पसंती दर्शवली आहे.

आगामी सिरीज कर्मा कॉलिंग, 26 जानेवारी 2024 रोजी Disney+ Hotstar वर प्रदर्शित होईल.

रुची नारायण दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये रवीना टंडन, नम्रता शेठ, वरुण सूद याशिवाय गौरव शर्मा, वालुशा डिसूझा, एमी आला, विराफ पटेल, पियुष खाटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कर्मा कॉलिंग यू.एस. मूळ मालिका 'रिव्हेंज'वर आधारित आहे, जी 2011-2015 मध्ये प्रसारित झाली होती. याशिवाय डिस्ने टेलिव्हिजन स्टुडिओचा एक भाग असलेल्या ABC सिग्नेचरने त्याची निर्मिती केली होती.

हॉटस्टार स्पेशलची कर्मा कॉलिंग वेबसिरीज 26 जानेवारी 2024 पासून Disney+ Hotstar वर पाहायला मिळेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT